कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात ५ फेब्रुवारी रोजी १३७ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७८६
Sat, 5 Feb 2022

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची रुग्णसंख्येतही पुन्हा एकदा भर पडली आहे,शनिवार दि.५ फेब्रुवारी रोजी एकूण १३७ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७८६ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद ३२, तुळजापूर १६, उमरगा २७, लोहारा १६, कळंब १५ , वाशी ८ , भूम १२, परंडा ११ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७३ हजार ४१६ रुग्ण आढळले असून , पैकी ७० हजार ५३५ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यं २१०० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.