उस्मानाबाद नामांतराचा ठराव पुन्हा मंत्रीमंडळात येणार 

 
s

उस्मानाबाद - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यापूर्वी जाता - जाता औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराचा ठराव मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर केला होता. मात्र मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे आरूढ होताच, ठाकरे सरकराचे १ एप्रिल २०२२ चे सर्व निर्णय रद्द केले आहेत. 

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय ठाकरे ( महाविकास आघाडी ) सरकारने अत्यंत घाईघाईत घेतला होता. पण या मंत्रिमंडळ निर्णयाचा जीआर देखील निघाला नव्हता.  आता सरकार बदलल्यामुळे हा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला आहे. 

 नामांतराचा ठराव पुन्हा मंत्रीमंडळात येणार

शिंदे - फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराचा ठराव पुन्हा मंत्रीमंडळात आणण्याचे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार  झाल्यानंतर हा ठराव पुन्हा येण्याची शक्यता आहे. 

केव्हा होणार नामांतर ? 

शिंदे - फडणवीस मंत्रिमंड्ळाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराचा ठराव मंजूर केल्यानंतर हा प्रस्ताव  विधीमंडळात चर्चेसाठी येईल. विधानसभा आणि विधान परिषदमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो केंद्राकडे पाठवला जाईल. केंद्र सरकार रेल्वे, पोस्ट आदी सहा  खात्याचे नाहरकत घेईल, त्यानंतर नामांतरास मंजुरी देईल. त्यानंतर शासकीय गॅझेटमध्ये बदल होऊन उस्मानाबादचे खऱ्या अर्थाने नामांतर होईल , त्यात मुस्लिम समाज नेते कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे नामांतर न्यायालयीन कचाट्यात अडकले तर उस्मानाबादचे नामांतर पुन्हा लांबणीवर पडेल. 

From around the web