उस्मानाबाद - उजनी रस्ता : चार टक्के लाच मागणारे दोन राजकीय पुढारी कोण ?

 
s

उस्मानाबाद ते बेंबळी हे केवळ २० ते २२ किलोमीटर अंतर आहे. बेंबळीला जाण्यासाठी पूर्वी फार तर अर्धा तास लागत होता, पण गेली चार वर्षे बेंबळीला जाण्यासाठी दीड तास लागत आहेत, संपूर्ण  रस्ता उखडलेला आहे. रस्त्यावर मोठे मोठं खड्डे पडलेले आहेत.  या रत्यावरून जाताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रवास  करताना हादरे बसत असल्याने लोकांना मणक्याचे विकार होत आहेत. अनेकांना मान  दुखी, अंगदुखी होत आहे पण कुणाला त्याचे सोयरसुतक दिसत नाही 

उस्मानाबाद ते उजनी या ३७ किलोमीटर रस्त्यासाठी १०४ कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे, परंतु या रस्त्याचे काम अत्यंत  ढिम्म गतीने सुरु आहे. रस्त्याचे कंत्राट घेतलेल्या कंपनीला दोन बड्या राजकीय नेत्यांनी ४ टक्के म्हणजे ४प्लस  ४ असे आठ कोटी लाच मागितल्याने हा रस्ता रखडलेला आहे, अशी चर्चा सुरु आहे. 

पूर्वी हा रस्ता डांबरीकरण केलेला होता. जेव्हा नवा रस्ता करण्याची मंजुरी मिळाली तेव्हा पूर्वीचे  डांबरीकरण उखडण्यात आले, रस्ता खोदण्यात आला, रुंदीकरण करण्यात आले, त्यात एक ते दीड वर्षे गेले, नंतर तीन शेतकऱ्यांनी योग्य मावेजा  मिळाला म्हणून न्यायालयात याचिका दाखल केल्याने पुन्हा एक वर्षे काम रखडले. सध्या  एका याचिकेचा निकाल लागलेला आहे आणि  ९ किलोमीटर रस्ता तयार करण्याची परवानगी मिळालेली असताना काम अत्यंत ढिम्म गतीने सुरु आहे. 

परवा , भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या रस्त्याची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, शेतकऱ्यांची अडचण यावर नाही, अशी ग्वाही दिलेली आहे, तरीही कंत्राटदार काम गलदगतीने काम करण्यास धजवत नाही. याला कारण म्हणजे दोन राजकीय पुढाऱ्यांचा अडसर.

उस्मानाबाद ते उजनी हा रस्ता पूर्ण झाला तर लातूर आणि लोहारा येथे जाण्यातही जवळचा मार्ग होणार आहे, पण विकासाच्या आड येणारे हे राजकीय पुढारी स्वतःच्या स्वार्थासाठी वेठीस धरणार असतील तर काम केव्हा पूर्ण  होणार आणि वाहतूक कधी सुरळीत होणार ? असा प्रश्न आहे.

From around the web