सोलापूर- उस्मानाबाद नवीन रेल्वेमार्गाच्या भूसंपादन कामास अधिकाऱ्यांनी गती द्यावी

- खा.ओमराजे निंबाळकर 
 
d

उस्मानाबाद -सोलापूर- तुळजापूर-उस्मानाबाद हा नवीन ब्रोडगेज रेल्वे मार्ग जिल्हयाच्या विकासासाठी मानबिंदू ठरणार आहे.त्यामुळे या रेल्वेमागाचे काम वेळेत सुरु होण्यासाठी यासाठी लागणाऱ्या जमीनीचे भूसंपादन,मोजणीचे काम गतीने व्हावे,यासाठी संबंधित रेल्वे आणि राज्यशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वता:लक्ष घालून प्राधान्याने हे काम करावे,असे आवाहन खासदार ओमप्रकाश ओमप्रकाश राजेनिबांळकर यांनी आज येथे केले.

     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या रेल्वेमार्गाच्या कामांसंबंधिची आढवा बैठक आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, रेल्वेचे कार्यकारी अभियंता रांनायन भगवानदीन,रेल्वेचे उपअभियंता राजेश नगराळे, रेल्वेचे अधिकारी आर.एन.राम,रेल्वेचे लातूर येथील अधिकारी दीपक सिंग,उस्मानाबाद येथील उपविभागीय अधिकारी योगेश सरमाटे तुळजापूर येथील भूमी अभिलेखच्या उपधिक्षक वैशाली गवई, सोलापूर येथील रेल्वेचे उपअभियंता नूर अस्लम आदी उपस्थित होते.

       या रेल्वेमार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस गती देण्यासाठी बोलावलेल्या याबैठकीत प्रामुख्याने भूसंपदनात येणाऱ्या आडचणीवर चर्चाही झाली.या रेल्वेमागासाठी उस्मानाबाद तालुक्यातील नऊ तर तुळजापूर तालुक्यातील 15 गावांच्या असे जिल्हयातील एकूण 24 गावांतील जमीनीचे संपादन करण्यात येणार आहे. या भूसंपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार भूसंपदानाची कार्यवाही उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी सुरुही केली आहे. 

संपादन करावायाच्या जमीनीचे उस्मानाबाद व तुळजापूर येथील भूमी अभिलेख विभागाचे उपधिक्षक मोजणीचे काम करीत आहेत . आवश्यक तेथे मोजणीच्या नोटीस देण्यात येत आहेत.या कामात रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून हवे असलेली मदत घेतली जात आहे.काही ठिकाणी उस्मानाबाद व तुळजापूर येथील भूमी अभिलेखचे अधिकारी संयुक्त पाहणीचे  काम करीत आहेत.त्यामुळे या भूसंपादनाचे काम गतीने सुरु आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी यावेळी दिली.

         या भूसंपादनाचा यापुढे दर पंधरा दिवसांनी बैठक घेवून आढवा घेण्यात येणार आहे, त्यामुळे हे काम गतीने होण्यास मदत होईल, असेही खासदार श्री. निबांळकर यांनी यावेळी स्प्ष्ट केले.

From around the web