नवाब मलिक यांचा उस्मानाबादला जमीन घोटाळा 

१ कोटी २२ लाख रुपये मुद्रांक शुल्क बुडविले
 
xx

उस्मानाबाद - ईडीच्या अटकेत असलेल्या राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी  उस्मानाबादला जमीन घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. मलिक यांनी आपल्या  कुटुंबीयांच्या च्या नावावर  उस्मानाबाद तालुक्यातील जवळे (दुमाला ) व आळणी शिवारात १५० एकर जमीन खरेदी केली होती. या जमिनीचे शासकीय दराने होणारे मूल्य ३ कोटी २९ लाख ६२ हजार असताना २ कोटी ७ लाख दाखवून  मलिक परिवाराने १ कोटी २२ लाख रुपये मुद्रांक शुल्क बुडविले, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पुन्हा एकदा नव्याने केला आहे. 

ही जमीन खरेदी करण्यासाठी पेसा कुठून आला, याची  ईडीने चौकशी करावी, अशी मागणीही काळे यांनी केली आहे. उस्मानाबाद तालुक्यात जमीन खरेदी करण्याचे नेमके काय प्रयोजन होते ? असा सवालही त्यांनी केला आहे. 

वास्तवीक हा जमीन खरेदी व्यवहार सन २०१३ - १४ मध्ये झालेला आहे. भाजपच्या काळे यांनी यापूर्वीही आवाज उठवला आहे, परंतु त्यावर कसलीही कारवाई झाली नव्हती, पण नवाब मलिक यांना ईडीने अटक करताच,काळे आणि भाजप कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे.

काळे म्हणाले की,  घरकाम व शेती काम करणाऱ्या नवाब मलिक यांच्या पत्नी मेहजबीन, मुलगी सना, फराज, मुलगा आमिर, बुश्रा संदुश फराज, नीलोफर समीर खान सर्व रा. २१८, सी-२, तळमजला, नूर मंदीर, कुर्ला वेस्ट, मुंबई यांच्या नावे दि.१९ डिसेंबर २०१३ साली उस्मानाबाद तालुक्यातील
जवळा (दु) येथील वसंतराव मुरकुटे व परीवारांची गट नं. २८३/२ क्षेत्र- २५.८५, गट नं. २८३/४ क्षेत्र- २०.१५, गट नं. २८३/५ क्षेत्र- ०९.५४ व आळणी शिवारातील गट नं. ३३९ क्षेत्र- ०४.२७ अशी एकूण- ५९.८१ सर्व आकडेवारी (हेक्टर व आरमध्ये) खरेदी केली आहे. यासाठी २ कोटी ७ लाख रुपये रक्कम खरेदीखत दाखविण्यात आले आहे. मात्र त्याच महिन्यात शासकीय दर पत्रकानुसार या जमिनीचे मूल्यांकन ‌(रेडीरेकनरचा दर) पाहिला असता या जमिनीचे ३ कोटी २९ लाख रुपये मूल्यांकन होत आहे. 

मलिक कुटुंबीयांनी या व्यवहारांमध्ये १ कोटी २२ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरलेली नसल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी लेखी मागणी  २०१३ साली केली होती. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात यावर सुनावणी झाली असता सदरील जमिनीच्या खरेदी व्यवहारात अनियमितता झाली असून फेर घेण्यात येऊ नये असे आदेश दिलेले आहेत. मात्र नवाब मलिक राज्याचे मंत्री झाल्यानंतर अधिकाऱ्यावर दबाव टाकून या जमिनीचे फेर ओढले गेले आहेत. त्यामुळे ही सर्व बेकायदेशीर प्रक्रिया असून १९६१ कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाने याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच जमीन घेण्यासाठी तो व्यक्ती शेतकरी असल्याचा पुरावा द्यावा लागतो तो दिला आहे किंवा नाही ? देखील सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. 


 मलिक यांच्या या जागेवर जनावरचा कत्तल खाना होणार होता, पण जवळे दुमाला ग्रामस्थांनी त्यावेळी विरोध केल्याने नवाब मलिक यांनी माघार घेतली, असा आरोपही  काळे यांनी केला आहे. 

From around the web