नंदगाव शेतकऱ्याच्या मुलीचे उत्तुंग यश 

कु. प्रतिभा जाधव पश्चिम बंगालमध्ये त्सुनामी विषयावर संशोधन करणार, पी.एच.डी साठी सिनियर रिसर्च फेलोशिप ... 
 
s

तुळजापूर -  तालुक्यातील नंदगाव येथील  कु. प्रतिभा प्रकाश जाधव यांची आयआयटी खरगपूर ( पश्चिम बंगाल )  येथे पी.एच.डी मध्ये   सायक्लोन, त्सुनामी या विषयावर संशोधन करण्यासाठी सिनियर रिसर्च फेलोशिप मिळाली आहे.

नांदगाव येथील शेतकरी प्रकाश सिद्राम जाधव व शैलाबाई प्रकाश जाधव यांची मुलगी  कु. प्रतिभा जाधव यांचे  शालेय शिक्षण जिल्हा परिषद नांदगाव येथे झाले असून,  बी.ई . हे के आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोल्हापूर येथे झाले आहे, एम.टेक हे एन्विरोंमेंटल इंजिनिअरिंग मधून केले आहे. आता त्यांना पी.एच.डी साठी आयआयटी खरगपूर मध्ये निवड झाली आहे.त्यांना सायक्लोन, त्सुनामी या विषयावर संशोधन करण्यासाठी सिनियर रिसर्च फेलोशिप मिळाली आहे.

उत्तर हिंदी महासागरात असलेल्या बंगालच्या उपसागरातील वादळाच्या समस्येवर कु. प्रतिभा जाधव संशोधन करणार आहेत. संख्यात्मक मॉडेल्सचा वापर करून बंगालच्या उपसागरात केवळ वादळच नव्हे तर सुनामीचाही त्या संशोधन करणार आहेत. तथापि, हे आव्हानात्मक समस्यांपैकी एक असून, जो अजूनही मोठ्या प्रमाणात अनुत्तरीत आहे, वादळाची लाट आणि नदी पूर यांच्यातील परस्परसंवादाची गणना आणि किनारपट्टीवरील पुराचे होणारे परिणाम व हवामानातील बदल यावर त्यांचा संशोधन सुरू आहे.त्यांच्या या यशाबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे. 

From around the web