ईटकळजवळ आर्थिक व्यवहाराच्या वादातून खून 

 
Osmanabad police

नळदुर्ग  : आर्थिक व्यवहाराच्या वादातून बोरामणी, ता. सोलापूर (दक्षिण) येथील इम्रान इरशाद जमादार यांनी दि. 17.02.2022 रोजी 15.00 वा. सु. ईटकळ येथील भैरवनाथ कुक्कूटपालन केंद्राजवळ ईटकळ ग्रामस्थ- राजु आनंदा वाघमारे, वय 25 वर्षे  यांच्या डोक्यात दगड मारुन त्यांचा खून केला आहे. अशा मजकुराच्या मयताचे पिता- आनंदा खंडू वाघमारे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 सह अ.जा.ज.प्र.कायदा कलम- 3 (2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारीच्या तीन घटना 

ढोकी  : टाकळी (ढोकी), ता. उस्मानाबाद येथील रुपेश व जया रुपेश शिंदे हे दोघे पती- पत्नी दि. 17.02.2022 रोजी 13.30 वा. सु. आपल्या घरात असतांना गावकरी- सचिन ढेकळे, सोनु सय्यद या दोघांनी शिंदे यांच्या घरात घुसून जुन्या वादाच्या कारणावरुन नमूद शिंदे पती- पत्नींस शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. अशा मजकुराच्या जया शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 323, 504, 34 सह अ.जा.ज.प्र. कायदा कलम- 3 (2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : यमगरवाडी, ता. तुळजापूर येथील राम भागवत वाघमारे, विकी अडसुळ, अजय भिसे या तीघांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 17.02.2022 रोजी 15.30 वा. सु. गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यावर गाकवरी- शिवाजी मल्हारी गायकवाड, शिवाजी गायकवाड, बालीका कांबळे, वंदना कांबळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शिवाजी गायकवाड यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : विष्णुपुरी, उमरगा येथील महादेव बडुरे, शिवानंद बडुरे, रेवण बडुरे, शानम्मा बडुरे या सर्वांनी जुन्या भांडणावरुन दि. 17.02.2022 रोजी 19.30 वा. सु. भाऊबंद- नागनाथ परमेश्वर बडुरे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या नागनाथ बडुरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web