तुळजापूर, उमरगा येथे मोटारसायकलची चोरी
तुळजापूर : मंकावती गल्ली, तुळजापूर येथील- प्रणव प्रविण प्रयाग, वय- 26 वर्षे यांची अंदाजे 60,000 ₹ किंमतीची रॉयल इन्फील्ड मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 1000 ही दि. 17.09.2022 रोजी 01.00 ते 06.00 वा. दरम्यान प्रणव प्रयाग यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रणव प्रयाग यांनी आज दि. 20.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : आशिव, ता. औसा येथील- साईनाथ शांताराम लोहार, वय 35 वर्षे यांनी आपली अंदाजे 20,000 किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 24 एच 1449 ही दि. 25.08.2022 रोजी 16.00 वा. सु. उमरगा येथील हुतात्मा स्मारकाच्या गेटसमोर लाउन जवळील एका हॉटेमध्ये अल्पोपहारासाठी गेले असता दरम्यानच्या काळात त्यांची नमूद मो.सा. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या साईनाथ लोहार यांनी आज दि. 20.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघात
नळदुर्ग : अणदुर, ता. तुळजापूर येथील- मुरलीधर तुळशीराम मोकाशे, वय 60 वर्षे हे दि. 19.09.2022 रोजी 09.45 वा. सु. आपल्या शेतातून घराकडे मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 1024 ही चालवत जात होते. दरम्यान खुदावाडी शिवारातील रस्ता वळणावर मोटारसायकलवरील त्यांचे नियंत्रण सुटून रस्त्याबाजूस असलेल्या जनावरांच्या गोठ्याच्या भिंतीस मो.सा. धडकली. या अपघातात मुरलीधर मोकाशे हे भिंतीवर आदळुन गंभीर जखमी होउन स्वत: मयत झाले. अशा मजकुराच्या मुरलीधर यांचा मुलगा- शाम मुरलीधर मोकाशे यांनी आज दि. 20.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.