अखिल भारतीय मराठा महासंघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी मोहन मुंडे

 
s

उस्मानाबाद  - अखिल भारतीय मराठा महासंघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी मोहन वसंतराव मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष नारायण थोरात, विभागीय अध्यक्ष गोपाळराव चव्हाण यांनी ही निवड केली आहे.

उस्मानाबाद येथे आज (दि.5) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी निवडीचे पत्र मोहन मुंडे यांना देण्यात आले. पत्रात म्हटले आहे की, या पदाचा उपयोग कै.अण्णासाहेब पाटील यांचे विचार व अखिल भारतीय मराठा महासंघाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी करावा. सर्वसामान्य नागरिक, सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तन,मन,धनाने तत्पर राहून सर्वतोपरी प्रयत्न करावे.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष विनोद इंगोले, बीड जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर कवचट, सच्चिदानंद शिंदे, विलास काकडे, सचिन तावडे, कुणाल निंबाळकर, बंडू आदरकर, राजाभाऊ कारंडे, संतोष क्षीरसागर, युवराज नळे , दत्ता पेठे , बापू पवार , प्रविण थोडसरे व इतर उपस्थित होते.
 

From around the web