महाविकास आघाडीत फूट , सेनेचे एक मत फुटले 

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक / अध्यक्षपदी बापूराव पाटील तर उपाध्यक्षपदी मधुकर मोटे 
 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष / उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक झाली असून, शिवसेना एकाकी पडली आहे. अध्यक्षपदी काँग्रेसचे बापूराव पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मधुकर मोटे यांची  ४ विरुद्ध ११ मतांनी निवड झाली आहे. एकाकी पडलेल्या शिवसेनेचे एक मत फुटल्याचे यावरून दिसून येते. 

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली होती. तर भाजपने एकाकी लढत दिली होती. महाविकास आघाडीने पाच जागा बिनविरोध तर दहा जागा जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या होत्या. त्यात शिवसेना ५, काँग्रेस ५ आणि राष्ट्रवादी ५ चे उमेदवार विजयी  झाले होते. २१ फेबुवारी रोजी निवडणूक पार पडली होती. 

d

सोमवारी  तीन वाजता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. . या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक झाली असून, शिवसेना एकाकी  पडली आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे बापूराव पाटील तर शिवसेनेतर्फे संजय देशमुख यांनी अर्ज दाखल केला होता  तर उपाध्यक्षपदासाठी राष्टवादीतर्फे मधुकर मोटे तर शिवसेनेतर्फे बळवंत तांबारे यांनी अर्ज दाखल होता,अध्यक्षपदी काँग्रेसचे बापूराव पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मधुकर मोटे यांची  ४ विरुद्ध ११ मतांनी निवड झाली आहे. एकाकी पडलेल्या शिवसेनेचे एक मत फुटल्याचे यावरून दिसून येते.परंड्याच्या एका माजी आमदाराचे मत फुटल्याची चर्चा सुरु आहे. 

s

महाविकास आघाडी करणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मोठा धोका दिला आहे. इतकेच नाही तर सेनेचे एक मत फुटल्याने त्याचे नगर परिषद आणि  जिल्हा परिषद निवडणुकीवर दूरगामी प्राणिनां होणार आहेत. 

From around the web