उस्मानाबादेत महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसीलदार संघटनेचे उस्मानाबाद येथे धरणे आंदोलन

 
s

उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने आज (दि.1) उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा शाखेने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार सहभागी झाले होते.

राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष  तथा उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांच्या नेतृत्वाखाली  प्रलंबीत सेवा विषयक मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले की, नायब तहसिलदार संवर्गाची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करण्यात यावी, तहसिलदार संवर्गाची सन 2011 पासूनची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करावी, नायब तहसिलदार संवर्गातून तहसलिदार संवर्गात पदोन्नती करण्यात यावी, तहसिलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती करण्यात यावी, नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची कालबध्द पदोन्नतीबाबतचे प्रलंबीत प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावे, परिविक्षाधीन नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे परिविक्षाधीन कालावधी समाप्तीबाबतचे  प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावे, नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे स्थायित्व प्रमाणपत्राबाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत, नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे प्रलंबीत सेवा जोड प्रस्ताव तसेच सेवानिवृत्त नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे प्रलंबीत सेवानिवृत्ती प्रकरणे व संबंधीत लाभ तात्काळ निकाली काढावेत, महिला अधिकाऱ्यांचे बाबतीत महसूल विभाग वाटप करतांना प्राधान्यांने सोईचे ठिकाण देण्याबाबत सुधारणा करावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या  आहेत.

  या आंदोलनात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार प्रवीण पांडे,  सौदागर तांदळे, संतोष रुईकर, योगिता कोल्हे, एन. बी. जाधव,  मुस्तफा खोंदे, उषा किरण शृंगारे, रेणुकादास देवणीकर, नायब तहसीलदार राजाराम  केलूरकर, पंकज मंदाडे, अर्चना मैंदर्गी,  चेतन पाटील, संतोष बोतीकर,  प्रभाकर मुगावे,  शिल्पा कदम, प्रियंका लोखंडे आदी सहभागी झाले होते.


 

From around the web