देवकुरूळीच्या साईबाबा कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित

 खताची जादा दराने विक्री केल्याने कृषी अधिकाऱ्याचा दणका 
 
sd

  उस्मानाबाद - देवकुरुळी (ता.तुळजापूर) येथील श्री साईबाबा कृषी सेवा केंद्रातून  खताची जादा दराने विक्री केल्याची तक्रार कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने चौकशी अंती परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी या खत विक्री केंद्राचा परवाना निलंबित केला आहे.

          या खत विक्रेत्याने आयपीएल या खत उत्पादकाचे म्युरेट ऑफ पोटॅश या खताची जादा दराने विक्री केल्याची लेखी तक्रार कृषी विभागाकडे प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश देऊन चौकशी केली. तपासणीमध्ये संबधित खत विक्री केंद्राने खत नियंत्रण आदेश 1985 चे कलम 3,4,5,8,35 चे उल्लंघन केल्याचे तसेच युरिया आणि डिएपी या खताचीसुध्दा जादा दराने विक्री केल्याचे आढळून आले होते. याअनुषंगाने संबंधित खत विक्री केंद्रास नोटिस देऊन सुनावणी घेण्यात आली. सुनावणी अंती संबंधित केद्र चालकांनी संयुक्तिक खुलासा न केल्याने या खत विक्री केंद्राचा परवाना निलंबित केला आहे.

          यापुढे  जिल्हयातील खत विक्री केंद्राने शेतक-यांना जादा दराने विक्री करणे, लिंकिंग करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्री केंद्र,गोदामात उपलब्ध असलेल्या खताचा साठा त्याची माहिती भावफलक,दरफलकावर नोंद न करणे आदी प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल,असाही इशारा संबंधित विभागाने दिला आहे.

         शेतक-यांना निविष्ठा उपलब्धतेबाबत आणि  दराबाबत काही अडचण,तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देण्याचे तसेच 02472 223794 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

From around the web