उस्मानाबाद,वाशिम जिल्ह्यात तलावांचे पुनरुज्जीवन

जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने सहभागी होण्याचे आवाहन
 
d

उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यातील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निती आयोग,भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील वाशिम आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यामधील लघुसिंचन साठवण तलाव,पाझर तलाव यामधील गाळ बाहेर काढून या तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी- जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

       जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये या मोहिमेच्या प्रचारा करिता दोन गाड्या प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तलावांचे पुनरुज्जीवन करण्याकरिता जिल्हा परिषद समन्वयक म्हणून यामुळे मध्ये सहभागी झालेली आहे. गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शेती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम जिल्ह्याभरात राबवली जात आहे.

 जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी आपल्या गावाची निवड होण्याकरिता ठरावाचा अर्ज भारतीय जैन संघटना कडे जमा करावा असे आवाहन जिल्हा प्रशासन, निती आणि आयोग जैन संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

From around the web