कोंडचे शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ . किसन लोमटे यांचा आणखी एक प्रताप ( Video)

शासकीय रुग्णवाहिकेचा वापर चक्क शेतातील गव्हाची वाहतूक करण्यासाठी सुरू
 
d

उस्मानाबाद  - तालुक्यातील कोंडच्या प्राथमिक आरोग्य केंदाचे  वैद्यकीय अधिकारी डॉ . किसन लोमटे यांचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. कोल्हेगाव येथे त्यांची शेती असून, या शेतात पिकलेले गहू त्यांनी शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क लातूरच्या बंगल्यावर नेल्याचा व्हिडीओ उस्मानाबाद लाइव्हच्या हाती लागला आहे. 

डॉ. लोमटे यांनी आरोग्य सेवक गुरव याच्या पत्नीला काही दिवसापूर्वी शरीर सुखाची मागणी केली होती. त्याची तक्रार ढोकी पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल आहे. त्याची एकीकडे चौकशी सुरु असताना हा नवीन प्रताप समोर आला आहे.

हा व्हिडीओ ५ मार्च २०२२ रोजीचा  आहे. कोल्हेगाव  येथील शेतातून आठ पोती  गव्हाची पोती शासकीय रुग्णवाहिकेत भरून लातूरच्या बंगल्यावर नेण्यात आली. यावेळी रुग्णालयाचा  डॉ. लोमटे, त्यांची पत्नी तसेच  एक कर्मचारी आणि रुग्ण वाहिकेचा चालक या व्हिडीओ मध्ये दिसत आहेत 

डॉ. लोमटे यांचे नवनवीन प्रताप समोर येत असताना जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सीईओ मूग गिळून गप्प आहेत, हे विशेष 


 

From around the web