तुळजाभवानी मंदिराच्या धर्तीवर खंडोबा मंदिराचा विकास होणार 

अणदूर येथे औरंगाबाद पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची देवस्थान ट्रस्टसोबत बैठक
 
s

उस्मानाबाद - तुळजाभवानी मंदिराच्या धर्तीवर अणदूर येथील श्री खंडोबा मंदिराचा विकास होणार आहे. त्याचा विकास आराखडा मंदिर समितीच्या वतीने राज्याच्या पर्यटन विभागाला सादर करण्यात येणार असून, यामुळे गावाचा कायापालट होणार आहे. 

अणदूर ( ता. तुळजापूर )  येथील खंडोबा मंदीराच्या विविध विकास कामांसाठी औरंगाबाद विभागीय पुरातत्व विभागाचे अधिकारी, देवस्थान ट्रस्ट व प्रमुख ग्रामस्थांची मंगळवारी (ता.१५) बैठक पुरातत्व  व पर्यटक विभाग औरंगाबाद उप अभियंता अभिषेक  मोदीराज  व वास्तुविशारद लक्ष्मीकांत सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली . 

s


मंदीरातील सुशोभीकरण,भक्त,निवास, दर्शन बारी,वाहनतळ, स्वच्छतागृह,बगीचा,अन्नछत्र हॉल आदी वास्तू बांधकाम करण्यात येणार असून त्यासाठी जागा उपलब्ध करणे, याबाबत प्रमुख ग्रामस्थ व ट्रस्टचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.यावेळी मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे आणि डॉ. नितीन ढेपे यांनी मंदिराच्या विकास कामाबद्दल माहिती देऊन मंदिराच्या विकास कामाबाबत अधिकाऱ्यांशी विचारविनिमय केला. 

    तुळजाभवानी मंदीराच्या धर्तीवर खंडोबा मंदिर विकसित करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सांगितले.यावेळी सरपंच रामचंद्र आलुरे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष मनोज मुळे, देवस्थान ट्रस्टचे सचिव सुनील ढेपे,डॉ.नितीन ढेपे, साहेबराव घुगे, अरविंद घोडके आदी उपस्थित होते. यावेळी मंदिर समितीच्या वतीने   पुरातत्व  व पर्यटक विभाग औरंगाबाद उप अभियंता अभिषेक  मोदीराज , वास्तुविशारद लक्ष्मीकांत सुर्वे,  तहसीलदार सौदागर तांदळे यांचा फेटा बांधून आणि श्रीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

s

From around the web