कळंब : दुय्यम निबंधक कार्यालयातील महिला शिपाई सहाशे रुपयाची लाच घेताना चतुर्भुज 

 
lach d

कळंब - दुय्यम निबंधक कार्यालयात ऑनलाइन नकला देण्यासाठी बाराशे रुपयांची लाच मागून तडजोडीअंती सहाशे रूपये लाच घेताना एका महिला शिपाईस एसीबी पथकाने र्नजहत पकडून गुन्हा दाखल केला आहे. सविता उत्तम इर्लेकर (वय 50 वर्षे ) असे या महिला शिपाईचे नाव आहे. 

यातील तक्रारदार यांचा कळंब येथे प्लॉट असून, सर्वे नंबर 225 मधील तीन खरेदी क्रमांकाच्या ऑनलाईन नकला मिळणे कामी त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय,कळंब येथे अर्ज केला होता. सदर ऑनलाईन नकला देण्यासाठी यातील आलोसे हिने तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष  1200/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 600/- रुपये स्वीकारण्याचे मान्य करुन 600/- रुपये लाच  पंचासमक्ष स्वतः स्वीकारली.


▶️ युनिट  - उस्मानाबाद
▶️ तक्रारदार- पुरुष, वय 30 वर्षे 
▶️ आरोपी लोकसेवक  :- सविता उत्तम इर्लेकर, वय 50 वर्षे, पद :- शिपाई, दुय्यम निबंधक कार्यालय, कळंब , जि. उस्मानाबाद (वर्ग-4)
➡️ लाचमागणी दिनांक :-  24/03/2022
➡️ लाच मागणी रक्कम :- 1200/- रुपये
▶️ लाच स्वीकृती दिनांक :- 24/03/2022
▶️ लाच स्वीकारली:- 600/- रुपये       
                      
▶️  कारण - यातील तक्रारदार यांचा कळंब येथे प्लॉट असून, सर्वे नंबर 225 मधील तीन खरेदी क्रमांकाच्या ऑनलाईन नकला मिळणे कामी त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय,कळंब येथे अर्ज केला होता. सदर ऑनलाईन नकला देण्यासाठी यातील आलोसे हिने तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष  1200/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 600/- रुपये स्वीकारण्याचे मान्य करुन 600/- रुपये लाच  पंचासमक्ष स्वतः स्वीकारली.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा अधिकारी: - अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि . उस्मानाबाद.
▶️मार्गदर्शक - .डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे,अपर पोलीस  अधीक्षक, ला. प्र .वि. औरंगाबाद , प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद.

➡️सापळा पथक - पोअ/ इफ्तेकार शेख,  सिद्धेश्वर तावसकर, विशाल डोके ,जाकेर  काझी,चालक दत्तात्रय करडेला.प्र.वि, उस्मानाबाद.

From around the web