पत्रकार सोनवणे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषीमित्र पुरस्काराने सन्मानित

 
sd

उस्मानाबाद  - महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय वसंतराव नाईक कृषीमित्र पुरस्कार दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे व नीता मल्लिकार्जुन सोनवणे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देऊन सन्मानित करण्यात आले.

नाशिक येथील म्हसरुळ रोडवरील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शिक्षण प्रशिक्षण प्रबोधिनी इमारतीच्या धन्वंतरी सभागृहात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे वितरण दि.२ मे रोजी करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे, अन्न पुरवठा व नागरी संरक्षण मंत्री छगन भुजबळ, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार आदीसह मान्यवर उपस्थित होते. सदरील पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह पैठणी, शाल व रोख रक्कम ३० हजार रुपये असे आहे.

सोनवणे यांना यापूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त पत्रकारिता पुरस्कार (२००९-१०),  कै. अनंत भालेराव स्मृती विशेष वार्ता पुरस्कार (२०१०), समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार (२०१०), कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती राष्ट्रीय कृषी वार्ता पुरस्कार (२०११), महात्मा गांधी तंटामुक्त पत्रकारिता पुरस्कार (२०१२-१३), राजमाता जिजाऊ स्वावलंबन उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (२०१३), महात्मा गांधी तंटामुक्त पत्रकारिता पुरस्कार (२०१३-१४), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार (२०१५-१६), स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (२०१७) व दर्पणदृष्टी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार (२०२०) आदी पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

From around the web