कोरोना काळात रुग्णाची लूट करणाऱ्या तीन खासगी डॉक्टरांवर चौकशीची टांगती तलवार 

विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला 
 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील तीन खासगी डॉक्टरांनी कोरोना  काळात अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करून रुग्णाची लूट केली होती आणि शासनाच्या नियमांचा भंग केला होता. कोरोना काळात रुग्णाकडून जादा उकळण्यात आलेली रक्कम परत करावी, अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. या मागणीची विभागीय आयुक्तांनी दखल घेऊन, जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागितला आहे. त्यामुळे तीन खासगी डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. 

s


काय आहे प्रकरण ? 

उस्मानाबाद शहरातील तीन खासगी डॉक्टरांनी कोरोना  काळात अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करून रुग्णाची लूट केली होती आणि शासनाच्या नियमांचा भंग केला होता. शासन निर्णय व अधिसुचना मधील निर्देशाप्रमाणे कोवीड-१९ खाजगी रुग्णालयाची नियमानुसार तपासणी करुन रुग्णांकडून शासनाने विहीत केलेले दरानुसार फीस आकारण्यात आली किंवा कसे? याबाबत प्रत्यक्ष देयके तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी, उस्मानाबाद यांनी नोडल अधिकारी व लेखा परीक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार लेखा परीक्षण पथकांनी डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख सह्याद्री हॉस्पीटल, उस्मानाबाद, डॉ. हर्षल राघवेंद्र डंबळ निरामय हॉस्पीटल, उस्मानाबाद व डॉ. प्रियंका नंदकिशोर परुथी-चौरे नवोदय हॉस्पीटल, उस्मानाबाद मधील रुग्णांचे देयके तपासून दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी, उस्मानाबाद यांना सादर केला असता  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी, उस्मानाबाद यांनी सदर तीनही हॉस्पीटल चालकांना नोटीस/अंतिम नोटीस बजावली होती.

परंतु सदर तीनही हॉस्पीटल चालकांनी सुरेश गं. केंद्रे नोडल अधिकारी कोवीड-१९ पथक प्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांचे मार्फत शिवकुमार स्वामी निवासी उप जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद व  कौस्तुभ दिवेगावकर तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी, उस्मानाबाद यांच्याशी आर्थिक तडजोड करुन सदर प्रकरणातील कार्यवाही संचिका सुरेश गं. केंद्रे नोडल अधिकारी कोवीड-१९ पथक प्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी हेतुपुरस्सकरपणे तब्बल १० महिने प्रलंबित ठेवल्याची गोपनीय माहिती सुभेदार यांना मिळाल्याने त्यांनी सुरेश गं. केंद्रे नोडल अधिकारी कोवीड-१९ पथक प्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्याकडे कोवीड-१९ रुग्णांच्या वैधकीय देयकांच्या तपासणी अंती जादा आकारण्यात आलेल्या रक्कमेच्या अनुषंगाने सह्याद्री हॉस्पीटल, उस्मानाबाद वरती केलेल्या कार्यवाही संचिकेच्या प्रमाणित प्रती मिळणे बाबत दिनांक २६ मे, २०२२ रोजी लेखी अर्ज केल्याने राम कांबळे वरिष्ठ सहाय्यक लेखा यांनी टिपणी द्वारे सदर प्रकरणातील संचिका उप कोषागार अधिकारी व नोडल अधिकारी यांच्या अभिप्रायासह शिवकुमार स्वामी निवासी उप जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांचे मार्फत कौस्तुभ दिवेगावकर तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे सादर केली असता त्यांनी अंतिम मुदत ४ आठवड्यांची द्यावी. रुग्णांची बिले न दिल्यास कायदेशीर कारवाई करावी. अशी दिनांक ०७ जून, २०२२ रोजी टिपणी मान्यता देऊन दुसऱ्यांदा कौस्तुभ दिवेगावकर तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी, उस्मानाबाद यांनी सदर हॉस्पीटल चालकांना अंतिम नोटीस बजावली आहे. परंतु दुसऱ्यांदा दिलेल्या अंतिम नोटीसची मुदत संपून जवळपास चार महिने होऊन गेले तरीदेखील अध्यापपावेतो सदर रुग्णालयांच्या चालकांविरुद्ध सुरेश गं. केंद्रे नोडल अधिकारी कोवीड-१९ पथक प्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी हेतूपुरस्करपणे कारवाई प्रस्तावित केली नसल्याचा आरोप सुभेदार यांनी केला आहे. 

शासनाने निश्चित करून दिलेल्या दरापेक्षा डॉक्टर वसुधा दिग्गज दापके- देशमुख यांचे सह्याद्री हॉस्पिटल उस्मानाबाद ने रक्कम रुपये 13 लाख 14 हजार व डॉक्टर हर्षल राघवेंद्र डंबळ यांचे निरामय हॉस्पिटल उस्मानाबाद ने रक्कम रुपये 87 हजार 300 तसेच डॉक्टर प्रियंका नंदकिशोर परुथी- चौरे यांचे नवोदय हॉस्पिटल उस्मानाबाद यांनी रक्कम रुपये सहा लाख 93 हजार 450 देयकामध्ये ज्यादा फीस आकारणी केलेली आहे सदर तपावतीची जादा रक्कम संबंधित रुग्णांना अद्याप पावेतो सदर रुग्णालय चालकांनी  परत केलेली नाही, त्यामुळे डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख सह्याद्री हॉस्पीटल, उस्मानाबाद, डॉ. हर्षल राघवेंद्र डंबळ निरामय हॉस्पीटल, उस्मानाबाद व डॉ. प्रियंका नंदकिशोर परुथी-चौरे नवोदय हॉस्पीटल, उस्मानाबाद यांनी नोटीसमध्ये नमुद जादा आकारण्यात आलेली रक्कम संबंधीत रुग्णांना अध्याप पावेतो परत केली नसल्याने त्यांनी शासन अधिसुचनेतील तरतुदीचा भंग केलेला आहे.

त्यामुळे त्यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८, भारतीय नर्सिग कायदा, साथरोग अधिनियम, १९८७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल (सुधारणा) कायदा, २००६ व महाराष्ट्र कोवीड उपाययोजना नियम, २०२० मधील तरतुदीनुसार तात्काळ कायदेशीर/दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. तसेच  सुरेश गं. केंद्रे नोडल अधिकारी कोवीड-१९ पथक प्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद व शिवकुमार स्वामी निवासी उप जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद तसेच कौस्तुभ दिवेगावकर तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी, उस्मानाबाद यांनी हेतुपुरस्करपणे सदर हॉस्पीटल चालकावरती कायदेशीर/दंडात्मक कार्यवाही अनुसरण्यास टाळाटाळ करुन त्यांनी त्यांचे कर्तव्य पालनात कसुर केला असल्याने त्यांचे विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करावी.असे सुभेदार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

From around the web