उस्मानाबादेत शिक्षक समन्वय समितीने विविध प्रलंबित प्रश्नी केले धरणे आंदोलन

 
d

उस्मानाबाद - वारंवार पाठपुरावा करुनही विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आज (दि.30) जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व प्राथमिक पदवीधर पदोन्नतीचे आदेश काढण्यात यावे,  गेली दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली हजारो वैद्यकीय देयके तात्काळ द्यावीत, पूरग्रस्तांसाठी जमा केलेला 25 लाख निधीचा हिशोब देऊन उर्वरित निधीचा विनियोग करावा, प्रलंबित पुरवणी देयकांसाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देयके पारित करावीत, प्रतिमहा मासिक वेतन तारखेलाच करावे,  शिक्षणाधिकारी माध्यमिक हे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी जाणूनबुजून अडथळे निर्माण करत असल्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित असून, सर्व प्रकरणे निकाली काढण्यात यावी, आकस्मिक मृत्यमुखी पडलेल्या डीसीपीएस बांधर्वाना सानुग्रह तदर्थ अनुदानाचा लाभ द्यावा, अहमदनगर जिल्हा परिषदेप्रमाणे पंचायत समिती अधिनियम 96 (1) नुसार वैद्यकीय देयकांचे रुपये 2 लाखांपर्यंतचे मंजुरी अधिकार पंचायत समिती स्तरावर बीडीओंना द्यावेत, अराजपत्रित मुख्याध्यापक पदोन्नतीमध्ये माध्यमिक शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी, दिव्यांग कर्मचारी व शिक्षकांना सहायक तंत्रज्ञान उपकरणे पुरविण्यात यावी, या प्रलंबित प्रश्नाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय समितीच्या वतीने कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला.

आंदोलनात बाळकृष्ण तांबारे, कल्याण बेताळे, विभीषण पाटील, लालासाहेब मगर, विक्रम पाटील, बशीर तांबोळी, विलास कंटेकुरे, अविनाश मोकाशे, बळवंत घोगरे, अभयकुमार यादव, पवन सूर्यवंशी, संतोष देशपांडे, बाळासाहेब वाघमारे, विठ्ठल माने, महादेव शिंदे, योगीराज कुंभार,  सुनील मुंढे, काशीनाथ भालके, विशाल अंधारे, संतोष भोजने, किशोर पिसे, प्रशांत माने, सुखदेव भालेकर, नितीन कोळी, सविता पांढरे आदींसह शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी, शिक्षक सहभागी झाले होते.
 

From around the web