उस्मानाबादेत चित्राताई वाघ यांनी साधला विद्यार्थिनींशी साधला 

 
s

उस्मानाबाद : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष श्रीमती चित्राताई वाघ यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा  सौ.अर्चनाताई पाटील होत्या.  

याप्रसंगी चित्राताई वाघ यांनी बोलताना महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र शासन व पोलीस यंत्रणा कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या वरती होणारे अत्याचार त्यापासून मुलींनी कसे दूर राहिले पाहिजे .सोशल मीडिया याचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे. तसेच आज स्वतःच्या प्रसिद्धीसाठी फिल्म इंडस्ट्री असेल किंवा मुली जे छोटे कपडे घालतात त्यावर त्यांनी कडाडून विरोध दर्शवत सुसंस्कारिक पिढी घडली पाहिजे , यावर त्यांनी भाष्य केले. 

sd

 कर्तव्यदक्ष स्त्री म्हणून काम करत असताना स्त्रीत्वाचे भान असावे. स्त्री ही कुणाची तरी आई आहे बहीण आहे पत्नी आहे म्हणून स्त्रीचा दर्जा हा जगाने मान्य केला आहे म्हणून स्त्रियांनी जगाची जनहित नायिका म्हणून काम करणे आवश्यक आहे. जगाचे मातृत्व स्त्रीने मान्य केले आहे आणि हे मातृत्व निभावत असताना समाजाशी आणि समाजाबरोबर कसे वागले पाहिजे याचाही विचार आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे. समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकृती वाढली आहे या विकृतीच्या विरोधात आवाज उठवणे आणि स्त्रियांनी एकत्रित राहणे गरजेचे आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण परवा साजरी केली त्यांचा वारसा आपण जपण्याचं काम केलं पाहिजे.ज्या साऊंनी आपल्याला शिक्षणाची दारं उघडी करून दिली.त्या साऊंचा वसा आणि वारसा जपण्याची गरज आज आपल्याला आहे. उद्या 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस हे आपल्या माता माऊली आहेत त्यांचे विचार आज घराघरापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.मुलींनो माझे तुम्हाला सांगणे आहे लढायला शिका घाबरू नका संघर्ष करा संघटित व्हा. असे विचार व्यक्त केले.

यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सरचिटणीस सौ.प्रेमाताई पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजीजिल्हाध्यक्ष-दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी आदित्य भैय्या पाटील,  भारतीय खोखो महासंघाचे सचिव चंद्रजीत जाधव सर,  महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष निरगुणे मॅडम, भारतीय जनता पार्टीचे नेते अनिलजी काळे जिल्हा परिषदेच्या . जिल्हा परिषद माजी अध्यक्ष-सौ.अस्मीता कांबळे, संस्था सदस्य. कुलकर्णी एस.एस,व महिला मोर्चाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी चित्राताई वाघ यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रशालेचे प्राचार्य एस.एस  देशमुख यांचा सत्कार करण्यात आला 
सूत्रसंचालन एस.एच जगताप  यांनी तर आभारआदित्य पाटील यांनी मानले. 

From around the web