दाऊतपूरमध्ये तत्कालीन सरपंचाकडून शासकीय गायरानातील झाडांची बेसुमार कत्तल

वन अधिकाऱ्याकडून अभय, सुभेदार यांची कारवाईची मागणी 
 
s

उस्मानाबाद - तालुक्यातील दाऊतपूर येथील सरपंच  बंकट बलभीम शिंदे यांनी शासकीय गायरानातील झाडांची बेसुमार कत्तल  करुन त्याचा कोळसा करुन विक्री केल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करून सर्व संबंधीत दोषी विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी विभागीय वनाधिकारी,उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे. 


                     ग्रामपंचायत दाऊतपूर ता. उस्मानाबाद येथील गायरान गट नंबर १ मधील एकून क्षेत्रफळ १२.६० हेक्टर हे क्षेत्र गावाच्या पूर्वेस लगत-तेरणा नदीच्या पुर्वपश्चिम बाजूस असून, नदीच्या पश्चिम भागातील काटेरी पूर्ण झुडपे व पश्चिम भागातील अंशत: झुडपे सरपंच बंकट बलभीम शिंदे यांनी जून-जुलै २०२१ मध्ये आदिवासी लोकाकडून तोडून, कायदेशीरपणे तोडलेल्या झुडपाच्या विल्हेवाटीचा ठराव न घेता, कोळसा करण्यास परवानगी (तोंडी) देऊन तेथील जागेत घनवृक्ष लागवड केली असल्याचे तसेच वृक्ष अधिकाऱ्याच्या पुर्व परवानगी शिवाय काटेरी झुडपे तोडल्याचे दिसून येते


                         विषयांकीत प्रकरणी कायद्याप्रमाणे चौकशी करण्याचे अधिकार हे वन विभागास असल्याने प्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करणेस्तव गट विकास अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद यांनी त्यांचे पत्राद्वारे प्रकरण वन विभागाकडे वर्ग केले असता विभागीय वनाधिकारी यांचे कार्यालयाच्या पत्राद्वारे वन परिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर मु. उस्मानाबाद यांना सदर प्रकरणी चौकशी करुन अहवाल विभागीय वनाधिकारी यांचे कार्यालयास सादर करण्याचे निर्देशीत केले असता त्यांनी वनपाल, उस्मानाबाद / वनरक्षक, आळणी यांनी प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन, पहाणी करुन पंचनामा व जबाब नोंदवून अहवाल सादर केल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुळजापूर मु उस्मानाबाद यांनी विभागीय वनाधिकारी उस्मानाबाद यांना कळविले आहे. परंतु वनपाल, उस्मानाबाद / वनरक्षक, आळणी यांनी वन परिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर मु. उस्मानाबाद यांना दिनांक १५/०३/२०२२ रोजी सादर केलेल्या अहवालाचे अवलोकन केले असता तो अहवाल नसून फक्त एक पत्र आहे. चौकशी अहवाल कसा देयचा असतो ते देखील जर विभागीय वनाधिकारी उस्मानाबाद किंवा त्यांचे अधिनिस्त वनपाल, उस्मानाबाद / वनरक्षक, आळणी व वन परिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर मु. उस्मानाबाद यांना ज्ञात नसेल तर ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे. 

ग्रामपंचायत, दाऊतपूर ता. उस्मानाबाद येथील गायरान गट नंबर १ मधील एकूण क्षेत्रफळ १२.६० हेक्टर हे क्षेत्र गावाच्या पूर्वेस लगत – तेरणा नदीच्या पुर्व व पश्चिम बाजूस असून, नदीच्या पश्चिम भागातील काटेरी पूर्ण झुडपे व पश्चिम भागातील अंशत: झुडपे वृक्ष अधिकाऱ्याच्या विना अनुमती, जून – जुलै, २०२१ मध्ये अदिवासी लोकाकडून तोडून, बेकायदेशीरपणे तोडलेल्या झुडपाच्या विलेवाटीचा ठराव न घेता, कोळसा करण्यास तोंडी परवानगी दिल्याचे सरपंच बंकट बलभीम शिंदे यांनी विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती, उस्मानाबाद  व उपसरपंच / ग्रामसेवक, ग्रामपंचायत, दाऊतपूर यांचे समक्ष दिनांक २७/०१/२०२२ रोजी स्वत:च्या हस्ताक्षरात नोंदविलेल्या जबाबात कबुल केले असल्याने हरी गोविंद सोलंकर, पोपट भगवान गडदे, सिद्राम ज्ञानदेव महाडीक, ज्ञानदेव दादाराव ठवरे, सचिन लक्ष्मण बनसोडे, दिलीप दगडु थोरात, प्रशांत वसंत थोरात व शिवाजी महादेव गिरी यांनी विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती, उस्मानाबद, पोलीस पाटील, दाऊतपूर, उपसरपंच/ग्रामसेवक, ग्रामपंचायत, दाऊतपूर व वन परिमंडळ अधिकारी, उस्मानाबाद तसेच वनरक्षक, आळणी यांचे समक्ष अनुक्रमे दिनांक २५/०१/२०२२ व दिनांक १४/०३/२०२२ तसेच दिनांक २१/१२/२०२१ रोजी खोटा पंचनामा करुन दिल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होते. 

तसेच शेषेराव विष्णू लोखंडे, मरगू भिमा गुजरे, राजकुमार बलभीम शिंदे व रामराजा शिवाजी शिंदे यांनी ग्रामसेवक, ग्रामपंचायत, दाऊतपूर यांचे समक्ष चौकशी अधिकारी तथा विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती, उस्मानाबद यांना दिनांक २५/०१/२०२२ रोजी खोटे निवेदन दिल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होते. तसेच बंकट बलभीम शिंदे सरपंच, ग्रामपंचायत, दाऊतपूर यांनी हरी गोविंद सोलंकर, सिद्राम ज्ञानदेव महाडीक, संतोष पांडूरंग मदने, उपसरपंच, ग्रामपंचायत, दाऊतपूर व वन परिमंडळ अधिकारी, उस्मानाबाद यांचे समक्ष दिनांक १४/०३/२०२२ रोजी खोटा जबाब नोंदविल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याने ते भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम २०१, २०२ व २०३ मधील तरतुदीनुसार करावयाच्या कारवाईस पात्र ठरतात.

वनपरिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर मु. उस्मानाबाद, वनपरिमंडळ अधिकारी, उस्मानाबाद व वनरक्षक, आळणी यांनी बंकट बलभीम शिंदे सरपंच, ग्रामपंचायत, दाऊतपूर यांच्याशी संगनमत करुन त्यांना हवा तसा त्यांच्या मर्जीनुसार दिनांक २१/१२/२०२१ व दिनांक १४/०३/२०२२ रोजी खोटा पंचनामा करुन गुन्हेगारास संरक्षण दिल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याने बी. ए. चौगले वनपरिक्षेत्र अधिकारी, तुळजापूर मु. उस्मानाबाद, आर. एम. शिंदे वनपरिमंडळ अधिकारी, उस्मानाबाद व वनरक्षक, आळणी हे भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १६६ (अ), १६७, १७७, १९१, १९२, १९३, २०१, २०२, २०३, २१७ व २१८ मधील तरतुदीनुसार करावयाच्या कारवाईस पात्र ठरतात, असे सुभेदार यांनी म्हटले आहे.

From around the web