उस्मानाबादेत भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 
d

उस्मानाबाद - एच.एस.सी परीक्षा मार्च 2022 परीक्षेमध्ये श्रीतपराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने लातूर विभागामध्ये दैयदिप्यामान यश मिळवले आहे. या परीक्षेमध्ये उत्कष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज मध्ये घेण्यात आला. यावेळी आदर्श  शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर (आण्णा) पाटील , प्रशासकिय अधिकारी आदित्य पाटील , प्राचार्य एस.एस देशमुख आदी उपस्थित होते. 


    यावेळी विज्ञान शाखेत 90% पेक्षा जास्त गुण घेतलेल्या एकूण 70 विद्यार्थींचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुधीर (आण्णा) पाटील यांनी महाविद्यालयातील शिक्षकांनी शिंस्तबध्द पध्दतीने अध्यापन केल्यामुळे हे यश मिळवता आले.असे विचार त्यांनी व्यक्त केले तसेच या कॉलेज मध्ये सर्व विषयाचा अभ्सासक्रम वेळेत पूर्ण करण्यात येतो. तसेच येथे वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. जादा तास,रात्र अभ्यासीका,जादा सराव परीक्षा,या मुळे कॉलेज व संस्थेची गुणवत्ता वाढत आहे. असे पाटील यांनी मत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.प्राचार्य देशमुख एस.एस.यांनी 5 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व वर्गामधील विविध शैक्षणिक उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळे श्री.सुधीर (आण्णा) पाटील,आदित्य पाटील,प्राचार्य श्री.देशमुख एस.एस.,उप.प्राचार्य श्री.घार्गे एस.के. यांच्या हस्ते विज्ञान,कला व वाणिज्य शाखेतील लातूर विभागात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यंचा बुके व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

विज्ञान शाखेमधुन 878 विद्यार्थ्यानी परीक्षा दिलेली होती.त्यापैकी 874 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.सरासरी निकाल 99.65% असुन पैकी 772 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेज मधुन प्रथम क्रमांक कु.कांबळे प्रशिक अतिश  शेकडा  574 गुण   95.67% ,व्दितीय कु.देशमुख अश्लेषा अजयराव 566 गुण 94.33% तसेच  तृतीय क्रमाकाचे एकूण 3 विद्यार्थी समान गुण घेतलेल विद्यार्थी कु.भोसले काजल रणजीत 561 गुण 93.5%, कु.गाडे नम्रता कचरु 561 गुण 93.5%, कु.मोमीन जव्हेरीया मोहम्मद फीरोज 561 गुण 93.5% आहेत.  व कला शाखेतुन 208 विद्यार्थी हे परीक्षेस बसलेले होते त्यापैकी 186 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.सरासरी निकाल 90.38% आहे. कॉलेज मधुन प्रथम क्रमांक कु.सावंत राजश्री रामेश्वर 536 गुण 89.33%, व्दितीय कु.पेठे जान्हवी विजयकुमार 535 गुण 89.17%,तृतीय कु.यादव सोनम विष्णू 534 गुण 89.00% तसेच वाणिज्य शाखेतून 177 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 170 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल 96.04% आहे.वाणिज्य शाखेतून कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक कु.कांबळे ऋतुजा बाबुराव 548 गुण 91.33%,व्दितीय क्रमांचे समान गुण असलेले 2 विद्यार्थी कु.डोंगरे निकीता दिनकर 546 गुण 91.00%, कु.उगले प्रतिक्षा पांडूरंग 546 गुण 91.00%,व तृतीय क्रमांक कु.तौर प्रतिक भगवत 544 गुण 90.67% आहेत.

    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष .सुधीर (आण्णा) पाटील, सरचिटणीस सौ.प्रेमाताई सुधीर पाटील,प्रशासकिय अधिकारी आदित्य पाटील,प्राचार्य .देशमुख एस.एस.उप.प्राचार्य श्री.घार्गे एस.के.,पर्यवेक्षक श्री.हाजगुडे टी.पी., कला वाणिज्य विभाग प्रमुख श्री.नन्नवरे एन.आर. फोटॅान प्रमुख श्री.भगत सर,फेनोमीनल प्रमुख श्री.पाटील जे.एस. तसेच सर्व  प्राध्यापक ,विषय प्रमुख,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यारी विद्यार्थी व पालक उपस्थिीत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा.श्री.पूजारी डी.व्ही.यांनी केले.

From around the web