राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित हिंगळजवाडीच्या कमल कुंभार यांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सत्कार

 
s

उस्मानाबाद - संपूर्ण भारतात उस्मानाबाची मान अभिमानाने उंचविणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.कमल कुंभार यांना जागतिक महिला दिनी केंद्र शासनाच्या वतीने दिला जाणारा नारीशक्ती पुरस्कार राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात महामहिम राष्ट्रपती .रामनाथ कोविंद जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पशुपालन,कुक्कुटपालन तसेच सौरऊर्जा उपकरणांद्वारे त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविला आहे. त्यांना नीती आयोगाच्या "वुमन ट्रान्सफार्म" तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या "इक्वेटर" पुरस्काराने यापूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे.

सर्वांना अभिमानास्पद व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा मानाचा नारी शक्ती पुरस्कार सौ. कमल कुंभार यांना मिळाल्याबद्दल भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. 

भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अर्चनाताई अंबुरे, भाजपाच्या नगरसेविका राणीताई पवार, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विद्या माने, सिंधु जाधव, जिल्हा सरचिटणीस वर्षाताई पाटील, भाजपा युवती मोर्चा जिल्हाध्यक्ष पुजा राठोड आदी  पदाधिकारी उपस्थित होत्या.

From around the web