कोरोनाचा कहर  : उस्मानाबाद जिल्ह्यात ३ फेब्रुवारी रोजी २०० रुग्णाची भर , एक मृत्यू 

जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९११
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या  झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे,गुरुवार दि.३ फेब्रुवारी रोजी एकूण २०० रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९११ झाली आहे तर दिल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 
 
आज  पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये  उस्मानाबाद ५५, तुळजापूर १३, उमरगा २७, लोहारा २७, कळंब २० , वाशी १७ , भूम ३२, परंडा ९ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात ३०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७३ हजार ११५ रुग्ण आढळले असून , पैकी ७० हजार १०९ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०९८ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

d

d

d

d

d

d

s

d

From around the web