कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात ४ फेब्रुवारी रोजी १६४ रुग्णाची भर, दोन मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८२६
Fri, 4 Feb 2022

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे,शुक्रवार दि.४ फेब्रुवारी रोजी एकूण १६४ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८२६ झाली आहे तर गेल्या २४ तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद ३९, तुळजापूर २०, उमरगा २४, लोहारा २२, कळंब १५ , वाशी १५ , भूम १७, परंडा १२ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७३ हजार २७९ रुग्ण आढळले असून , पैकी ७० हजार ३५८ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यं २१०० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.