कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १ फेब्रुवारी रोजी ७९ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९६५
Tue, 1 Feb 2022

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे,सोमवार दि.१ फेब्रुवारी रोजी एकूण ७९ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९६५ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद ४२, तुळजापूर १३, उमरगा १३, लोहारा ०, कळंब ७ , वाशी ० , भूम १, परंडा ३ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात १८० रुग्ण बरे होऊन घरी परतले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ७५२ रुग्ण आढळले असून , पैकी ६९ हजार ६५२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०९३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.