उस्मानाबाद ​​​​​​​जिल्ह्यातील रखडलेले विविध प्रकल्प आणि योजना यांच्या कामाला गती द्यावी - पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत

 
s

उस्मानाबाद - जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प, महावितरणकडून अधिकचे रोहित्र, विविध योजना यांचा आढावा घेऊन या कामाला अधिक गती द्यावी अशा सूचना पालकमंत्री डॉ तानाजी जाधव यांनी दिल्या.

           जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकास कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आ. राणा जगतसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या विविध विभागाचे विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.

           जिल्ह्यात 25 सप्टेंबर पर्यंत पाऊस झाला. त्यात झालेल्या नुकसानांचे पंचनामे झालेले आहेत. त्या संदर्भातील अहवाल मंत्रालयात पाठविल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. महावितरण, एस. ई. एफ.फंड यातून करावयाच्या कामाला अधिक गती देण्याची सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिली.

            पाणंद रस्ते, गौण खनिज विषयक बाबी, कृष्णा मराठवाडा प्रकल्प टप्पा 1 चा आढावा पालकमंत्री यांनी यावेळी घेतला. एस. टी. डेपो स्थानांतरण, बी. ओ. टी. तत्वावर बस स्थानक बांधकामाबाबतही बैठकीत चर्चा झाली ते काम करण्याबाबतही पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सूचना दिल्या.

           नगर रचना, जलसंधारण, जलसंपदा या विभागांच्या कामाचा आढावा घेऊन या कामाचा सातत्याने जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा करावा असे निर्देशही पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

From around the web