ग्रंथ व वृक्ष दिंडीने ग्रंथोत्सवास होणार सुरुवात

जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा - जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी
 
s

उस्मानाबाद -  राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालक व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव 2022 च्या ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथ व वृक्ष दिंडीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल वा. सुर्यवंशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.8 डिसेंबर रोजी दिली.

         उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव २०२२ संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक माहिती अधिकारी यासेरुद्दीन काझी उपस्थित होते. पुढे बोलताना सुर्यवंशी म्हणाले की, यासाठी विद्यार्थ्यांची ग्रंथ व वृक्ष दिंडी सकाळी 8 ते 10 या वेळेत लेडीज क्लब मार्गे उस्मानाबाद शहरातील आनंद नगर येथे काढण्यात येणार आहे. तर या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते सकाळी 11.00 वाजता करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे हे विशेष पाहुणे म्हणून तसेच आ. कैलास पाटील, आ. सतीश चव्हाण, आ ज्ञानराज चौगुले, आ विक्रम काळे, आ राणाजगजितसिंह पाटील, आ सुरेश धस, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, ग्रंथालय संचालक दत्तात्रेय शिरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, मसापचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सु.स. हुसे व उस्मानाबाद जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व.ग. सुर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. 

दुपारी 2 ते 4 या वेळात विश्वस्तांची कर्तव्य व जबाबदाऱ्या हे परिसंवाद सत्र आयोजित केले आहे. या विषयी उस्मानाबाद येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त संजय पी. पाईकराव हे मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष व.ग. सुर्यवंशी व‌ सूत्रसंचालन लहुराज लोमटे हे करणार आहेत. तसेच दुपारी 4 ते 6 या दरम्यान कवी संमेलन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कवी डी.के. शेख व सूत्रसंचालन युवराज नळे हे करणार आहेत. यामध्ये शाम नवले, अरविंद हंगरगेकर, समाधान शिकेतोडे, अविनाश मुंडे, शंकर कसबे, शिवराज मेनकुदळे, बप्पासाहेब नाईकनवरे, युवराज चव्हाण, किरण देशमाने, सोनाली आरडले, सविता बिडवे, विद्या देशमुख, संगीता भांडवले, अर्पणा चौधरी व संगीता पोतदार हे सहभागी होणार आहेत. तर दि.11 डिसेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामात उस्मानाबाद जिल्ह्याचे योगदान या विषयी प्रा डॉ. सतिश कदम व भाऊसाहेब उमाटे हे व्याख्यान देणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य डॉ रमेश दाबके तर सर्जेराव इंदलकर हे सूत्रसंचालन करणार आहेत. 


तसेच दुपारी 1 ते 2 या दरम्यान वाचन संस्कृतीवर होणारे समाज माध्यमाचे परिणाम या मध्ये अक्रूर सोनटक्के पवार आबासाहेब अडसूळ व सर्जेराव इंदलकर यांचे चर्चा आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे संतोष पवार हे अध्यक्ष तर साधना विश्वकर या सूत्रसंचालन करणार आहेत. तसेच ‌ दुपारी तीन ते चार या दरम्यान स्पर्धा परीक्षा संधी व आव्हाने या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण हे असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहूराज लोमटे हे करणार आहेत. यामध्ये प्रभारी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संजय गुरव शितल चव्हाण व नालंदा अकॅडमीचे संचालक गोपाळ हजारे हे सहभागी होणार आहेत. तर कार्यक्रमाचा समारोप शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी अध्यक्ष म्हणून मसापचे अध्यक्ष नितीन तावडे व रवींद्र केसकर हे सूत्रसंचालन करणार आहेत. या यावेळी 15 पुस्तक विक्रीचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुर्यवंशी यांनी केली आहे.

From around the web