गोरेवाडी :  गावठाणमधील भूखंड बेकायदेशीर विक्री करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हे दाखल होणार 

 
news

उस्मानाबाद  - तालुक्यातील गोरेवाडी येथील गोरेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या गावठाणमधील अतिक्रमण करून निनावी मालकीचा भूखंड बेकायदेशीर विक्री करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या  सुनिता राजेंद्र सदर व राजेंद्र गंगाराम सगर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश  महसूलचे तहसिलदार प्रवीण पांडे यांनी व विभागीय अधिकारी व तहसिलदार उस्मानाबाद यांना दिले आहेत.

दिलेल्या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की उस्मानाबाद तालुक्यातील गोरेवाडी येथील नवनाथ सोजीराम जोगदंड यांनी दि.१४ मार्च २०२२ रोजी या ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेच्या अतिक्रमण प्रकरणी अर्ज संदर्भीय अर्जान्वये त्यांनी अर्जात नमुद केले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील गोरेवाडी ग्रामपंचायत गावठाणमधील अतिक्रमित करून निनावी मालकीचा भूखंड बेकायदेशीर विक्री करणारे राजेंद्र गंगाराम सगर व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सुनिता राजेंद्र सगर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश होण्यासाठी अर्ज सादर केला आहे.

उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राची प्रत देवून कळविण्यात येते की, विषयांकित प्रकरणात सखोल चौकशी करून नियमानुसार उचित कार्यवाही करावी व त्याचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा व अर्जदारास आपल्या स्तरावरून परस्पर कळविण्यात यावे. प्रकरणात विलंब टाळावा असे नमूद करण्यात आले आहे.

x

From around the web