गुड न्यूज : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली
Tue, 8 Feb 2022

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज मंगळवार दि. ८ फेब्रुवारी रोजी १८ नव्या कोरोना रुग्णाची भर पडली तर १८६ रुग्ण बरे होवून घरी परतले. त्यामुळे जिल्हयात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६०३ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद ११, तुळजापूर १, उमरगा १, लोहारा ०, कळंब १ , वाशी ० , भूम ०, परंडा ४ असा समावेश आहे .
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७३ हजार ६२५ रुग्ण आढळले असून , पैकी ७० हजार ९२४ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यं २१०० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.