गुड न्यूज : उस्मानाबाद जिल्ह्यातून कोरोना हद्दपार
जिल्ह्यात केवळ ४१ ऍक्टिव्ह रुग्ण
Feb 27, 2022, 22:30 IST
उस्मानाबाद - कोरोनाची तिसरी लाट अखेर ओसरली असून, उस्मानाबाद जिल्ह्यातून कोरोना जवळपास हद्दपार झाला आहे. गेल्या काही दिवसापासून रुग्णसंख्या पाचच्या आत आली असून, आज दि. २७ फेब्रुवारी रोजी केवळ दोन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कळंब वगळता अन्य सात तालुक्यात रुग्ण संख्या शून्य आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७४ हजार १०६ रुग्ण आढळून आले असून, ७१ हजार ९६२ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात केवळ ४१ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २१०५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.