उस्मानाबादेत सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
उस्मानाबाद - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना होऊन तब्बल 90 वर्ष पूर्ण होत आहेत. 90 वर्षापूर्वी दि.15 ऑक्टोबर 1932 रोजी समाज कल्याण विभागाची स्थापना मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून झालेली आहे. समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांचे मार्गदर्शनानुसार सामाजिक न्याय विभाग स्थापना दिवस दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उस्मानाबाद येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला होता.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षि शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रतिमेस पुष्प्हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीप प्रजोलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील लाभार्थींनी उपस्थित राहून कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला.येथील जिल्हा परिषद मार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना युआईडी कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित लाभार्थींना पुष्पगुच्छं देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सहाय्य्क आयुक्त् समाज कल्याण यांच्या मार्फत सर्वांना अल्पोहारची सोय करण्यात आली होती.
या कार्यक्रमास जि.प.चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती संशोधन अधिकारी एस.टी. नाईकवाडी प्रादेशिक व्यवस्थापक पोपट झोंबाडे, आर्थिक विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक वसंतराव नाईक शेषेराव राठोड, जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सचिव, तेर येथील कार्यालय अधिक्षिका एस.ए.गवळी सहाय्य्क आयुक्त् समाज कल्याण, सामाजिक न्याय विभागातील सर्व कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते इत्यादी उपस्थिती होते.