तेरणा बंद लाईन प्रकरणी माजी राज्यमंत्री पाटील यांनी सभागृहात आवाज उठवावा -  पृथ्वीराज आंधळे

 
rana

 उस्मानाबाद - माजी राज्यमंत्री,तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी तेरणा धरण परिसरातील बंद पाईपलाईन प्रकरणी नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशनात आवाज उठवून शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पृथ्वीराज आंधळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

       आंधळे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, माजी  गृहराज्यमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांचे वारसदार म्हणून आमदार राणा जगजितसिंह पाटील विधानसभेत तुळजापूर तालुक्याचे नेतृत्व करत आहेत. तेर आणि परिसरातील सात हजार शेतकऱ्यांना पिकासाठी उपयुक्त असणारी तेरणा धरणातील पाईपलाईन बंद आहे. तब्बल 37 कोटी रुपये खर्च करून देखील या योजनेचा शेतकऱ्यांना अद्याप लाभ झालेला नाही, ही अत्यंत निराशाजनक बाब आहे. 

तेरचे सुपुत्र या नात्याने आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी आपल्या भागातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी  नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये आवाज उठून पाईपलाईन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने या भागातील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल आणि याकरिता आमदार राणा जगजितसिम्ह  पाटील यांनी सभागृहामध्ये वस्तुस्थिती मांडावी, अशी अपेक्षा पृथ्वीराज आंधळे यांनी व्यक्त केली आहे.

From around the web