मुरूम दंगल प्रकरणी सपोनि अशोक माळी यांच्यासह पाच पोलीस कर्मचारी निलंबित 

 
d

मुरूम - मुरूम दंगल प्रकरणी सहा. पोलिस निरीक्षक अशोक नवनाथ माळी आणि चार पोलीस कर्मचारी अश्या एकूण पाच जणांना निलंबित करण्यात आल्याने खळबळ  उडाली आहे. 

मुरूम  शहरात ७ मे रोजी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गालबोट लागले होते. .सय्यद गल्ली, मुरुम येथून दि 07 मे रोजी 20.15 वा. सु.बसवेश्वर जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक चालली होती. यावेळी या मिरवणूकीत सामिल असलेल्या जवळपास १२ जणांनी दोन जातीत धार्मीक तेढ निर्माण होईल या उद्देशाने गल्लीत दगड फेक केली  होती. याप्रकरणी भा.दं.सं. कलम- 153, 295, 337, 143, 147, 148, 149, 324, 323, 427 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. 

दंगल झाल्या दुसऱ्या दिवशी औरंगाबाद विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना  मुरूम गावास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी पोलिसांविषयी गंभीर तक्रारी केल्या होत्या. 

मिरवणुकीमध्ये  पोलीस बंदोबस्त नीट ठेवला नाही, निष्काळजीपणा केला म्हणून सहा. पोलिस निरीक्षक अशोक नवनाथ माळी  आणि चार पोलीस कर्मचारी अश्या एकूण पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. 

काय आहे प्रकरण ? 

मुरुम शहरात शनिवारी (दि. ७)  महात्मा बसवेश्वर  जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान गोंधळ झाला. मिरवणुकीत सहभागी असलेल्या जवळपास १२ जणांवर जातीत धार्मिक तेढ निर्माण होईल, या उद्देशाने गल्लीत दगडफेक केल्याचा आराेप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दंगल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मुरुमला भेट दिली. त्यांनी चौकशी केली असता पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच दंगल झाल्याचे निदर्शनास आले.

यामध्ये पोलिसांनी दोन्ही गटांमध्ये समन्वय न ठेवणे, उग्र कृती करणाऱ्यांना नोटीस न बजावणे आदी कारणांमुळेच दंगलसदृश्य परिस्थिती अगोदर नियंत्रणात राहिली नाही. याचा ठपका सहाय्यक पेालिस निरीक्षक सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक नवनाथ माळी यांच्यावर ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
तसेच योग्य प्रकारे बंदोबस्त न लावणे, जमावाला नियंत्रित न करणे, बंदोबस्ताकडे दुर्लक्ष करून अन्यत्र फिरणे, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येणे आदी कारणांमुळे पोलिस हवालदार संदिपान अंबादास कोळी, पोलिस शिपाई सौरभ जगन्नाथ घुगे, श्रीराम सोपान सोनटक्के, अमर प्रताप जाधव या चौघांना निलंबित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप यांना अभय 

वास्तविक पाहता सहायक पोलिस निरीक्षक रंगनाथ जगताप यांचीही उचलबांगडी करणे गरजेचे आहे,मिरवणूक दरम्यान बंदोबस्तला ते स्वतः होते . ज्या ठिकाणी घटना घडली तिथे रंगनाथ जगताप यांनी निष्क्रियता बजावली आहे,घटनास्थळी 1 तास  गोंधळ सुरू असताना जगताप यांनी गांभीर्यता बाळगली नाही, वाद होईल अशी स्थिती घडेल असे बरेच जण जगताप यांना माहिती दिल्याचे समजते मात्र जगताप यांनी सदरच्या ठिकाणी त्यांना  पोलीसी दरारा वापरून कडक सूचना देणे आवश्यक होते मात्र त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि एकप्रकारे दोन्ही गटाला वाद होण्यास मुभा मिळाली यात आणखी म्हणजे नगर परिषदकडून  शहरातील मिरवणूक मार्गात कांही अडथळे आहेत का? याबाबत काळजी घेण्यात आली नाही त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचा निष्क्रियता दंगलीला कारण ठरत आहे

From around the web