शेतकऱ्यांनी सावध राहावे नाही, तर होईल अर्थिक फसवणूक 

शिवार हेल्पलाइनकडून शेतक-यांना आवाहन
 
news

धाराशिव ( उस्मानाबाद ) - प्रधानमंत्री कुसूम योजनेंतर्गत सौरपंपासाठी अर्ज करणा-या अनेक शेतक-यांच्या भ्रमणध्वीवर फसवे संदेश पाठविले जात आहेत. त्यातुन शेतक-यांची फसवणुक होण्याची शक्यता असून, या संदेशापासून सावध रहावे अनेक जिल्हयातील शेतक-यांनी या फसव्या संदेशा बाबत सायबर सेलकडे तक्रारी केल्या आहेत. त्यात काही बनावट संकेतस्थळ, मोबाइल ॲप, दुरध्वनी आणि भ्रमणध्वनीव्दारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळण्यासाठी अर्ज करण्यास नोंदणी शुल्क आणि सौरपंपाची किंमत ऑनलाईन भरण्यास सांगितले जात आहे. अश्या खोटया संकेतस्थळासह मोबाइल ॲपला प्रतिसाद देवू नका, तसेच फसव्या दुरध्वनी व भ्रमणध्वनीवरील प्रलोभणाला बळी पडू नका, अश्या संकेतस्थळावर, ॲपवर ऑनलाईन पध्दतिने पैसे भरु नका. प्रधानमंत्री कुसूम योजना शासनाच्या महाउर्जा राबविण्यात येते आहे. या योजनेच्या सविस्तर माहीतीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी महाउर्जेच्या संकेतस्थळावर भेट दयावी असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे

या अधिच खरीपातील अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेली आहेत. बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी,  त्यात खरीपातील पिक विमा पण न मिळाल्यामुळे आर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे, पण शेवटी आताच्या परिस्थितीत त्यातून आलेली हतबलता यामुळे बेचैन होणे साहजिकच आहे, पण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नका, हीसुद्धा वेळ निघून जाईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असो, आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण हार मानू नका. फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्ला, मार्गदर्शन देऊन, त्रस्त शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे.फक्त शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ एक फोन करा, असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.

यासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय, गडपाटी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

From around the web