नूतन पोलीस अधीक्षक जॉईन होण्याअगोरच नीवा जैन यांना निरोप 

 
d

 उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांची पोलीस उपमहानिरीक्षक पदोन्नती होउन नागपूर पोलीस आयुक्तालयात अतिरीक्त पोलीस आयुक्त पदावर दि. 21 एप्रील रोजी बदली जाहिर झाली होती. त्यास अनुसरून आज दि. 7 मे रोजी त्यांनी मुख्यालयातील समारंभात अपर पोलीस अधीक्षकनवनित काँवत यांना पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सोपवला असून बदलीकामी त्या कार्यमुक्त झाल्या आहेत. 

यावेळी जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देउन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा पोलीस दलातील बहुसंख्य अधिकारी- अंमलदार व मंत्रालयीन कारकुन उपस्थित होते.

नीवा जैन  यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला होता. पण अवघ्या सात महिन्यात त्यांची नागपूरला बदली झाली आहे. नीवा जैन यांची कारकीर्द उल्लेखनीय अशी झालीच नाही. त्यांनी कोणतेही ठोस अशी कारवाई केली नाही. दरम्यान, नूतन पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे जॉईन होण्याअगोरच नीवा जैन यांनी आपला पदभार सोडला आहे. 

d


 

From around the web