उस्मानाबाद तालुक्यातील ८६ गावठाणाची ड्रोनव्दारे मोजणी सुरु

 
news

उस्मानाबाद -  उस्मानाबाद तालुक्यातील ८६ गावांच्या गावठाणातील मिळकतींची मोजणी ड्रोन कॅमे-याच्या माध्यामातून करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय तयारी करण्यात आलेली आहे. मंगळवार  दि. २२ मार्चपासून या ड्रोन व्दारे मोजणीस प्रत्यक्ष सुरवात करण्यात येणार आहे.तेंव्हा ड्रोन मोजणीच्या वेळी प्रत्येक मिळकत धारकाने ग्रामसभेत मार्गदर्शन केल्याप्रमाणे आपली घरे आणि सहनची जागा चुन्याच्या सहाय्याने सिमांकित करावी असे आवाहन उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी केले आहे.

 शासनाच्या धोरणानुसार गावठाणाच्या हद्दी निश्चित करण्यासाठी तालुक्यातील ८६ गावांची गावठाणातील मिळकतीच्या ड्रोनच्या माध्यामातून नोंदणी करण्यात येणार आहे. या ड्रोनव्दारे होणा-या मोजणीच्या आगोदर प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेण्यात येणार आहे. तसेच या कामाची जनजागृती करण्यासाठी प्रत्येक गावात दवंडीही देण्यात येणार आहे. या कामासाठी भारतीय सर्वेक्षण विभागाची ड्रोन फलाइंगची टिम उस्मानाबाद तालुक्यात दाखल झाली आहे. ही मोजणी कोव्हिड-१९ संदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन करण्यात येणार आहे. तशा सूचना संबंधित पथकाला देण्यात आल्या आहेत. या मोजणीच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यामातून केले जाणार आहे.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक २०१९ नुसार महाराष्ट्र राज्यातील महानगरपालीका, नगरपालीका, नगरपंचायत क्षेत्र वगळून उर्वरीत गावठाण क्षेत्रातील नगर भूमापन न झालेल्या गावठाणा क्षेत्राचे ड्रोनव्दारे भूमापन करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प शासनाने दिलेला आहे. त्यानुसार ही मोजणी करण्यात येणार आहे. या मोजणीमुळे ग्रामपंचायतींना मोठया प्रमाणात फायदे होणार आहेत. यामध्ये गावठाणातील प्रत्येक मिळकतींचे मालकीहक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक तयार होणार आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता या मालमत्ता कराच्या कक्षेत येतील.त्यामुळे ग्रामपंचायतींच्या महसुलात वाढ होणार होईल.

ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन यासाठी अभिलेख आणि नकाशा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नियोजन करण्यास सुलभता निर्माण होणार आहे. ग्रामपंचायतीलकडील मालमत्ता कर, निर्धारण पत्रक, आपोआप स्वयंम चलनात तयार होईल. हस्तांतणाच्या नोंदी अद्ययावत करणे सहज पारदर्शक व सुलभ होतील. गांवठाणाच्या हदीतील ग्रामपंचायत मिळकती व सार्वजनिक मिळकती जागा तसेच प्रत्येक मिळकतीच्या सिमा निश्चित होतील व ते जनतेस माहितीसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे गावठाणातील मिळकतीचे वाद कमी प्रमाणात उदभवतील यासाठी ही मोजणी मोजणी करण्यत येणार आहे

From around the web