गुरव समाजाची बदनामी करणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करण्याची मागणी 

 
s

उस्मानाबाद  - अणदूर मध्ये  दोन समाजात तेढ निर्माण करून धार्मिक भावना भडकावने, गुरव समाजाची नाहक बदनामी करून वेठीस धरणे, मंदिरातील पुजाऱ्यांना हाकलून लावण्याचे प्रक्षोभक भाषण करणे, बेकायदेशीर जमाव जमवून  गुरव समाजाविरुद्ध गावातून मोर्चा काढणे प्रकरणी  राजेंद्र स्वामी, अरविंद घोडके आणि राजेश  देवसिंगकर यांच्याविरुद्ध  कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समस्त गुरव समाजाच्या वतीने आज  तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. 

अणदूर येथे श्री खंडोबाचे मंदिर असून, आम्ही वंश परंपरागत पुजारी आहोत. रविवार दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मंदिरात  छबिना मिरवणुकीत एका समाजातील काही तरुणांनी गुरव समाजातील  तरुणांना बेदम मारहाण केल्याने  आठ ते दहा तरुण जखमी झाले. त्यानंतर तणाव वाढला असता, पोलीस आल्यानंतर  वातावरण निवळले होते. 

दुसऱ्या दिवशी दि, २२ ऑगस्ट रोजी रात्री सात वाजता राजेंद्र स्वामी , अरविंद बाबुराव घोडके, राजेश विजयकुमार देवसिंगकर  यांनी काही तरुणांना भडकावून मंदिरात बेकायदेशीर सभा घेऊन  गुरव समाजाची नाहक बदनामी केली. मंदिरातील पुजाऱ्यांना हाकलून लावू, गुरव समाजाची शेती काढून  घेऊ असे प्रक्षोभक भाषणे केली, त्यानंतर दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास २० ते २५ तरुणांना घेऊन गावातून निषेध मोर्चा काढून गुरव समाजातील लोक आणि पुजाऱ्याविरुद्ध घोषणा दिल्या. तसेच पुजाऱ्यांना हाकलून लावण्याचे भाषण केले., तसेच वातावरण अधिक पेटावे यासाठी दि. २४ ऑगस्ट पासून ग्रामपंचायत समोर अरविंद घोडके यांनी पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी  उपोषण सुरु केले आहे. 

s

भांडणाचे निमित्त करून संपूर्ण गुरव समाजाला वेठीस धरणे,  दोन समाजात तेढ निर्माण करणे, गुरव समाजाची नाहक बदनामी करणे , प्रक्षोभक भाषण करणे, बेकायदेशीर जमाव जमवून  गुरव समाजाविरुद्ध गावातून मोर्चा काढणे प्रकरणी राजेंद्र स्वामी , अरविंद बाबुराव घोडके, राजेश विजयकुमार देवसिंगकर  यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे. वरील तिघांवर कारवाई न झाल्यास तुळजापूर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण  करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर पन्नासहुन  अधिक गुरव समाज बांधवाच्या सह्या आहेत. 


 

From around the web