आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया पुर्ववत करण्याची मागणी

आमदार कैलास घाडगे पाटील यांचे मुख्यमंत्र्यासह सबंधित मंत्री, सचिवाना निवेदन
 
s

धाराशिव (उस्मानाबाद) - येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया नाकारण्यात आली असुन ही प्रक्रिया  पूर्ववत होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे आमदार कैलास घाडगे पाटील यानी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

एका बाजुला जिल्ह्यात यंदापासुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया होत आहे, तर वर्षानुवर्ष सूरु असलेल्या शासकीय महाविद्यालयात यंदापासुन प्रवेश नाकारण्यात आल्याने जिल्ह्यावर हा मोठा अन्याय ठरणार असल्याची भावना घाडगे पाटील यानी व्यक्त केली आहे.  


राज्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असुन प्रक्रियेदरम्यान शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये अपुरा कर्मचारी वर्ग,पायाभूत सुविधांची कमतरता आदी निकषावरुन पाच शासकीय महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेची परवानगी नाकारल्याचे राष्ट्रीय भारतीय चिकिस्ता पद्धती परिषद (नॅशनल कमिशन फॉर इंडीयन सिस्टीम ऑफ मेडीसिन) एनसीआयएसएम यांनी कळविले आहे.त्यामध्ये धाराशिव (उस्मानाबाद) येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाचाही समावेश करण्यात आला आहे.यामुळे या निकषाची पुर्तता तातडीने करुन ही प्रक्रिया सूरु होणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या काळात आयुर्वेदिक महाविद्यालयात वाढती रुग्णसंख्या,उपचारामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे.शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.धाराशिव येथील महाविद्यालयाची पदवी प्रवेश क्षमता ६३ असून पदवीत्तर प्रवेश क्षमता ४८ अशी एकूण १११ प्रवेश क्षमता आहे.अपुरा कर्मचारी वर्ग,महाविद्यालयातील पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे यंदाच्यावर्षी प्रथम वर्ष विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया नाकारली असून पदवीत्तर प्रवेश क्षमता ४८ वरून २३ इतकी झालेली आहे.त्यामुळे धाराशिव येथील महाविद्यालयातील त्रुटींची पूर्तता करून प्रथम वर्षाची विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ववत सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.मागण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि मुख्य सचिव सकारात्मकता दर्शवतील आणि विद्यार्थ्याचे हित जोपासतील अशी अपेक्षा आमदार कैलास घाडगे पाटील यानी व्यक्त केली आहे.
 

From around the web