उस्मानाबादेतील दरोड्याचा तपास एलसीबीकडे देण्याची मागणी

 
s

उस्मानाबाद  - शहरातील बँक कॉलनी, पोस्ट कॉलनी व जेलच्या मागील  परिसरातील भागांमध्ये वारंवार दरोड्याच्या घटना घडत असून पोलिस प्रशासनाने हे गांभीर्याने घेऊन या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे  (एलसीबी) देण्यात यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे सहाय्यक पोलिस अधीक्षक यांच्याकडे दि.८ फेब्रुवारी रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी सहाय्यक पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेऊन या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्याची व परिसरातील नागरिकांमध्ये जे भितीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात त्यांना दिलासा देण्यासाठी आपण कडक कारवाई करावी अशी चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा विधिज्ञ मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधी विभागाच्यावतीने दि.८ फेब्रुवारी रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी आमचा तपास योग्य दिशेने चालू आहे निश्चित परिणाम दिसून येईल असे आश्वासन अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी दिले.

 निवेदन देताना जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ऍड. नितीन भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष ऍड. निलेश बारखडे पाटील, उस्मानाबाद तालुकाध्यक्षऍड. चैतन्य वीर, तुळजापूर तालुकाध्यक्ष ऍड. सिद्धेश्वर जमदाडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत माने उपस्थित होते.

From around the web