दाऊतपूरचे पोलीस पाटील संतोष मदने सेवामुक्त 

खोटे शपथपत्र दिले म्हणून गुन्हा दाखल होणार 
 
d
दाऊतपूरचे सरपंच, उपसरपंच, एक सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यावरही टांगती तलवार 

उस्मानाबाद -  तालुक्यातील दाऊतपूरचे पोलीस पाटील संतोष पांडुरंग मदने यांना उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे यांनी सेवामुक्त करून खोटे शपथपत्र दिले म्हणून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. तसेच दाऊतपूरचे सरपंच, उपसरपंच, एक सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष अश्या चौघावर खोटा जबाब दिला म्हणून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा आदेशही दिला आहे. 

पोलीस पाटील पदावर कार्यरत असताना इतर ठिकाणी नोकरी करता येत नाही, असा नियम असताना  दाऊतपूरचे पोलीस पाटील संतोष पांडुरंग मदने हे अदानी कॅपिटल प्रा. लि. या कंपनीत सोलापुरात वसुली प्रतिनिधी म्हणून काम करत होते. मात्र ते मी कुठेही नोकरी करीत नाही, असे खोटे शपथपत्र सन २०१८ मध्ये  नियुक्तीवेळी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दिले होते. 

याप्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी  उप विभागीय दंडाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याची सुनावणी उपविभागीय दंडाधिकारी , उस्मानाबाद यांच्याकडे झाली असता, दाऊतपूरचे सरपंच, उपसरपंच, एक सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष यांनी खोटा जबाब दिला. 

याप्रकरणी उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे यांनी दाऊतपूरचे पोलीस पाटील संतोष पांडुरंग मदने यांना सेवामुक्त करून खोटे शपथपत्र दिले म्हणून ढोकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. तसेच दाऊतपूरचे सरपंच, उपसरपंच, एक सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष अश्या चौघावर खोटा जबाब दिला म्हणून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा आदेशही ढोकी पोलिसांना दिला आहे. 

या निकालानंतर दाऊतपूर गावात खळबळ उडाली असून, सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार  यांची अनेकांनि धास्ती घेतली आहे.

d

d

From around the web