पत्रकार धनंजय रणदिवे यांच्या समता नगरमधील अवैध कॉम्प्लेक्स प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रॉस चेक 

पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे यांच्या अडचणीत वाढ
 
randive

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या समता नगर मधील अवैध कॉम्प्लेक्स प्रकरणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, त्यात त्यांनी खोटी माहिती दिल्याने परवान्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली आहेत, त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 


धनंजय रणदिवे यांनी उस्मानाबाद शहरातील समता नगर मेन रोडवर जे कॉम्प्लेक्स बांधले आहे, त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचे बांधकाम अवैध केल्याची तक्रार रोखठोक युवा सामाजिक  कार्यकर्त्या सपना किसनराव माळी  यांनी उस्मानाबाद पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे  यांच्याकडे २७ नोव्हेंबर २०२० रोजी तक्रार केली होती, पण त्यांनी कोणतेही कारवाई न केल्याने माळी यांनी जिल्हाधिकारी , उस्मानाबाद यांच्याकडे ४ ऑगस्ट २०२१ रोजी तक्रार केली होती. 

या तक्रारीनंतर  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे यांना खुलासा विचारला असता, त्यांनी  गुळगुळीत खुलासा केला होता. हा खुलासा अमान्य करून येलगट्टे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात होती. त्यावर त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचे बांधकाम वैध असल्याचे कळवले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी क्रॉस चेक करण्यासाठी सर्व कागदपत्रे मागितली आहे. 

त्यात प्रस्तुत प्रकरणात आतापर्यंत दिलेले बांधकाम परवानगी प्रमाणपत्रे व मंजूर नकाशाच्या प्रती, प्रत्येक परवानगी देताना भरणा करण्यात आलेले विकास शुल्क रक्कमेचा तपशील, जागेवर प्रत्यक्ष झालेले बांधकाम क्षेत्राचा मजला निहाय तपशील मागितला आहे. त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

d


काय आहे प्रकरण ? 

उस्मानाबाद शहरात समता नगर भागात अकबर रहिमतुल्ला शेख यांची जागा असून, तळमजला आणि पहिला त्यांच्या मालकीचा आहे. धनंजय रणदिवे यांनी पहिल्या मजल्यावरील स्लॅबची जागा  विकत  घेऊन,दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचे  बांधकाम अवैधरित्या केले आहे. या  कॉम्प्लेसचा पाया अत्यंत कुमकुवत असून, यामुळे तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील गाळेधारक अडचणीत सापडले आहेत . 

एक तर कॉम्प्लेक्सला साइड पार्किंग नाही, चोहोबाजूनी मोकळी जागा सोडलेली नाही, FSI ( चटई निर्देशांक ) नाही, तसेच  बांधकाम परवान्यातील नियम आणि अटींचे उल्लंघन केलेले आहे. 


 
याप्रकरणी नगर पालिकेने धनंजय रणदिवे यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना,  मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे यांनी हेतुपुरस्करपणे कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे स्वतः  मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे अडचणीत आले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी कोणता दणका देणार ? याकडे लक्ष वेधले आहे.

यापूर्वीचे वृत्त 

पत्रकार धनंजय रणदिवे यांच्या अवैध कॉम्प्लेक्स बांधकाम प्रकरणी न.प. मुख्याधिकारी अडचणीत

From around the web