आपल्या कार्यातूनच स्वत:ची ओळख निर्माण करा : कौस्तुभ दिवेगावकर

मावळते जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना भावपूर्ण निरोप 
 
s

उस्मानाबाद:- उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची पदोन्नतीने बदली झाल्यामुळे त्यांचा येथील नियोजन भवन येथे अधिकारी, कर्मचारी, कर्मचारी संघटनांचे अध्यक्ष यांचेकडून आज निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,  अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, रोहयोचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार गणेश माळी यांनी श्री. दिवेगावकर यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

s

 या प्रसंगी श्री.दिवेगावकर यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांना सर्वांनी मिळून एकत्र काम करण्याचे महत्व सांगितले. प्रत्येकांनी आपापल्या कार्यक्रमाची जबाबदारी ओळखायला पाहिजे आणि आपली ज्या कामाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे, त्या कामास न्याय मिळाला पाहिजे. आपले कार्य हीच आपली ओळख झाली पाहिजे, असेही श्री. दिवेगावकर यावेळी म्हणाले.

s

  यावेळी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, तुळजापूर मंदिर संस्थानच्या तहसीलदार योगिता कोल्हे, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक कुलकर्णी, जिल्हा कृषी अधिकारी, तुळजापूर मंदिर संस्थानचे  तसेच इतर विभागातील अधिकारी-कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आणि सूत्र संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे यांनी केले तर उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी आभार व्यक्त केले आणि श्री. दिवेगावकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

From around the web