कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ७ फेब्रुवारी रोजी ७७ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७८८
Feb 7, 2022, 19:06 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज सोमवार दि. ७ फेब्रुवारी रोजी ७७ नव्या कोरोना रुग्णाची भर पडली तर १५९ रुग्ण बरे होवून घरी परतले. त्यामुळे जिल्हयात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७८८ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद १९, तुळजापूर५, उमरगा ९, लोहारा ११, कळंब १२ , वाशी ८ , भूम ८, परंडा ५ असा समावेश आहे .
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७३ हजार ६२१ रुग्ण आढळले असून , पैकी ७० हजार ७३८ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यं २१०० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.