कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ६ फेब्रुवारी रोजी १२८ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८७०
Sun, 6 Feb 2022

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज रविवार दि. ६ फेब्रुवारी रोजी १२८ नव्या कोरोना रुग्णाची भर पडली तर ४४ रुग्ण बरे होवून घरी परतले. त्यामुळे जिल्हयात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८७० झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद ४२, तुळजापूर ८, उमरगा ३०, लोहारा १२, कळंब १३ , वाशी ६ , भूम १०, परंडा ७ असा समावेश आहे .
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७३ हजार ५४४ रुग्ण आढळले असून , पैकी ७० हजार ५७९ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यं २१०० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.