उस्मानाबादचे वादग्रस्त तहसीलदार गणेश माळी चौकशीच्या फेऱ्यात
उस्मानाबादचे वादग्रस्त तहसीलदार गणेश माळी यांच्या भ्रष्ट कारभाराची आणि उद्धट वर्तनाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी राज्याचे अप्पर मुख्य सचिव ( महसूल ) यांच्याकडे २९ / ९/ २०२२ रोजी एका निवेदनाद्वारे केली होती.
या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार गणेश माळी यांच्या भ्रष्ट कारभाराची आणि उद्धट वर्तनाची चौकशी करून आवश्यक त्या कागदपत्रासह चौकशी अहवाल तातडीने शासनास सादर करण्याचे निर्देश कार्यासन अधिकारी यादव यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
तहसीलदार गणेश माळी यांच्या भ्रष्ट कारभाराची आणि उद्धट वर्तनाची सविस्तर तक्रार सुभेदार यांनी दिल्याने राज्याचे अप्पर मुख्य सचिव ( महसूल ) यांनी गंभीर दाखल घेतली आहे. त्यामुळे तहसीलदार गणेश माळी यांचे धाबे दणाणले आहेत.