उमरग्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक इक्कबाल सय्यद यांची अवघ्या तीन महिन्यात उचलबांगडी... 

 
s

उस्मानाबाद  - उमरगा पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक इक्कबाल सय्यद यांची अवघ्या तीन महिन्यात उस्मानाबाद पोलीस नियंत्रण कक्षात  उचलबांगडी  करण्यात आली आहे. 

 इक्कबाल सय्यद यांच्यावर लाचखोरीच्या आरोप असून पैसे देऊन उमरग्याला पोस्टिंग घेतल्याची चर्चा सुरु  आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक ( आयजी ) यांच्या   आदेशावरून उस्मानाबादला अवघ्या तीन महिन्यात उचलबांगडी करण्यात आली आहे. उस्मानाबादच्या एका पोलीस  निरीक्षकांनी मध्यस्थी केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. 

वादग्रस्त पोलीस निरीक्षक इक्कबाल सय्यद हे  सन २००८ मध्ये उमरग्याला सपोनि म्हणून कार्यरत असताना एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, पुन्हा त्यांना उमरग्याला पोस्टिंग देण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

वादग्रस्त पोलीस निरीक्षक इक्कबाल सय्यद यांची बदली करावी, म्हणून मनसेचे शाहूराज माने यांनी तक्रार देखील केली होती. 

d

From around the web