वादग्रस्त सिव्हिल सर्जन डॉ. धनंजय पाटील यांची उचलबांगडी 

डॉ. राजाभाऊ गलांडे यांच्याकडे पुन्हा पदभार 
 
osmanabad cs

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांची लातूरला उचलबांगडी करण्यात आली असून, डॉ. राजाभाऊ गलांडे यांच्याकडे पुन्हा पदभार देण्यात आला आहे. 

कोरोना काळात हलगर्जीपणा केला म्हणून डॉ. राजाभाऊ गलांडे यांच्याकडुन जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा पदभार काढून तो डॉ. धनंजय पाटील यांच्याकडे देण्यात आला होता, पण त्यापेक्षा वाईट अनुभव डॉ. पाटील यांच्या काळात आला. 

वशिल्याने तट्टू असलेल्या डॉ. धनंजय पाटील यांच्या काळात जिल्हा शासकीय रुग्णालयात अनागोंदी माजली होती, तसेच कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम  डॉ. धनंजय पाटील यांनी केले होते. 

अखेर वादग्रस्त सिव्हिल सर्जन डॉ. धनंजय पाटील यांची लातूरला उचलबांगडी करण्यात आली असून, डॉ. राजाभाऊ गलांडे यांच्याकडे पुन्हा पदभार देण्यात आला आहे.  दरम्यान, उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालय नव्याने सुरु होणाऱ्या  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास जोडण्यात आल्याने जिल्हा रुग्णालयांचा कारभार सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 
 

From around the web