येरमाळ्याच्या श्री येडेश्वरी यात्रेमुळे वाहतूक मार्गात बदल 

 
s

उस्मानाबाद -  जिल्हयातील श्री येडेश्वरी यात्रा हि दिनांक 16.04.2022 ते 21.04.2022 सपन्न्‍ होत आहे. नमुद कालावधीत अवजड वाहने ही औरंगाबाद ते येरमाळा मार्गे बार्शीकडे जाणारी वाहतुक येरमाळा उडडान पलावरुन येडशी मार्गे बार्शीकडे पथक्रमण करील.बार्शी ते येरमाळा मार्गे औरंगाबाद कडे येणारी वाहतुक बार्शी, कुसळंब, पांगरी ,येडशी, येरमाळा उडडान पुला वरुन औरंगाबादकडे पथक्रमण करील. कळंब ते येरमाळा मार्गे बार्शी कडे  जाणारी वाहतुक कळंब मोहा फाटा (मनुष्यबळ पाटी) दहिफळ, येडशी, पांगरी, कुसळंब मार्गे बार्शीकडे पथक्रमण करील. बार्शी  ते येरमाळा मार्गे कळंब कडे येणारी वाहतुक बार्शी, कुसळंब, पांगरी, येडशी दहिफळ, मोहा फाटा (मनुष्यबळ पाटी) मार्गे कळंब कडे पथक्रमण करील.अशा प्रकारे वाहतुक मार्गात बदल करण्यात आलेला आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील श्री येडेश्वरी यात्रेस येणा-या भावीका करीता, वाहन पार्कींग ही उस्मानाबाद कडुन येणारे भावीक करीता मलकापुर पाटी चढाजवळ -राजयोग हॉटेल जवळ, तर कळंब-केज कडुन येणारे भावीका करीता कळंब रोड वरील हॉटेल अनुष्का जवळ, तर बीड कडुन येणारे वाहना करीता हॉटेल शिवशाही येरमाळा रोड या ठिकाणी,  तसेच बर्शी कडुन येणारे वाहना करीता येडेश्वरी कमान मोकळया जागेत वाहन पार्कींग व्यवस्था करण्यात आलेली आहे. नमुद ठिकाणी वाहने लावुन पायी देवीच्या दर्शन करीता जाता येईल.

From around the web