बेंबळी, बरगमाव, पाटोदा रस्त्यासाठी छाव्यांचा बांधकाम विभागात ठिय्या

स्वतः पाहणी करुन काम पूर्ण करण्याचे अभियंत्यांचे आश्वासन
 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी-बरमगाव-पाटोदा रस्त्याच्या कामासाठी वारंवार पाठपुरावा करुन देखील दखल न घेतल्याने अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.2) सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर  सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या प्रशासनाने नमते धोरण घेत स्वतः कामाच्या ठिकाणी जाऊन काम पूर्ण करुन घेण्याचे लेखी आश्वासन दिले.

बेंबळी-बरमगाव-पाटोदा रस्त्याच्या डांबरीकरणाला मंजुरी असताना त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने (क्र.1) दुर्लक्ष केल्यामुळे या मार्गावर जनतेचे बेहाल होत आहेत. त्यामुळे रस्ताकामासाठी वारंवार पत्रव्यवहार करुन, उपोषण आंदोलन करुन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही. आंदोलनानंतर लेखी आश्वासन देऊनही कोणत्याही कामाला गती मिळाली नाही. त्यामुळे संतप्त छावा कार्यकर्त्यांसह बरमगाव, पाटोदा येथील ग्रामस्थांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभाग (क्र.1) कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग (क्र.1) च्या उपविभागीय अभियंत्यांनी सदरील कामाची स्वतः शाखा अभियंत्यासह पाहणी करुन काम पूर्ण करुन घेण्याचे आश्वासन दिले.

d

या आंदोलनात छावाचे युवक जिल्हाध्यक्ष कालिदास गायकवाड, शशिकांत पाटील, रोहित पाटील, वसुदेव पाचंगे, गणेश लाड, राजेंद्र साळुंके यांच्यासह पाटोदा, बरमगाव परिसरातील युवक सहभागी झाले होते.
 

From around the web